Home /News /mumbai /

Nitesh Rane: नितेश राणेंना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही

Nitesh Rane: नितेश राणेंना दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही

BJP MLA Nitesh Rane: भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी अटकपूर्व जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या अटकपूर्व जामीनावर आज न्यायालयात सुनावणी झाली.

मुंबई, 4 जानेवारी : भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) हे गेल्या अनेक दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या (Sindhudurg District Central Co operative Bank Election) रणधुमाळीत शिवसेना उमेदवार सतीश सावंत (Satish Sawant) यांचा प्रचार करणारे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नितेश राणे यांनी अटक पूर्व जामीनासाठी सिंधुदुर्गातील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली होती. नितेश राणे यांच्या या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. काय झालं सुनावणीत? मुंबई उच्च न्यायालयात नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. नितेश राणेंच्यावतीनं जेष्ठ कायदेतज्ञ नितीन प्रधान यांचा युक्तिवाद केला. तर या सुनावणी दरम्यान राज्य सरकारकच्या वतीने नितेश राणे यांच्यावर आरोप करत म्हटलं, नितेश राणे हेच या हल्यामागचे सूत्रधार आहेत. आम्हाला यात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी द्यावी अशी राज्य सरकारकडून परवानगी मागण्यात आली. राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली. तसेच पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर अटकेची कारवाई करणार नाही अशी ग्वाहीही राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी दुपारी 2.30 वाजता होणार आहे. पुढील सुावणीपर्यंत अटकेची कारवाई होणार नसल्याची ग्वाही राज्य सरकारकडून देण्यात आल्याने नितेश राणे यांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा : नितेश राणे फरार, आता गोव्यातही शोध सुरू; जामिनासाठी हायकोर्टात धाव सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. कोर्टाच्या निर्णयानंतर पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. नितेश राणेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती. पण आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर अटकेची कारवाई करणार नसल्याची ग्वाही दिली आहे. काय आहे प्रकरण? शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले. या हल्ल्याचा कट रचण्यात आमदार नितेश राणे यांचा सहभाग होता, असा आरोप परब यांनी केला आहे. या हल्ल्याच्या कटाचे धागेदोरे नितेश राणे यांच्यापर्यंत कसे पोहोचतात, याचे पुरावे सरकारी वकिलांनी सत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये काही कॉल डिटेल्सचाही समावेश होता. त्याची खातरजमा करण्यासाठी नितेश राणे यांचा फोन जप्त करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद त्यांनी केला होता. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे होण्यासाठी नितेश राणे अटकेत हवे आहेत, असा दावा सरकारी वकिलांनी केला होता. हा दावा मान्य करत कोर्टानं नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BJP, Mumbai high court, Nitesh rane

पुढील बातम्या