Home /News /mumbai /

'उद्धव ठाकरे म्हणजे पनवतीयों का बाप; Corona...Tauktae...सगळं वाईटचं घडतंय'

'उद्धव ठाकरे म्हणजे पनवतीयों का बाप; Corona...Tauktae...सगळं वाईटचं घडतंय'

तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

    मुंबई, 17 मे : कोरोनाच्या संकटाचा (Corona) सामना करतानाच राज्यात चक्रीवादळाचा (Cyclone Tauktae) तडाखाही बसला आहे. राज्यात प्रामुख्याने मुंबई आणि कोकणाबरोबरच (Mumbai and Konkan) इतरही काही ठिकाणी वादळी वारा आणि पावसामुळं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. या वादळाच्या परिस्थितीवरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या काळात सर्वकाही वाईटच होत असल्याचं म्हणत, त्यांनी वादग्रस्त टीकाही केली आहे. (वाचा-'चक्रीवादळ गुजरातला पळवण्याचा मोदी-शाहांचा डाव; राऊत वादळाला मुंबईतच अडवणार') राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यात 36 चा आकडा असल्याचं कायमचं पाहायला मिळतं. त्यातही ठाकरे कुटुंबीयांवर राणे आवर्जुन टीका करत असल्याचं पाहायला मिळतं. कोणतीही संधी ते दवडत नाहीत. राज्यात सध्या तौक्ते चक्रीवादळानं थैमान घातलं आहे. तसंच कोरोनाचंही संकट राज्यावर आहेच. याच मुद्द्यांना धरून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारं एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख पनवती असा केला आहे. (वाचा-Cyclone Tauktae: मुंबई हवामान केंद्रालाही चक्रीवादळाचा फटका; झाडांची पडझड) उद्धव ठाकरे यांच्या सरकारला राज्यात सत्तेत येऊन दोन वर्षे झाली. यात 2020 मध्ये आलेलं चक्रीवादळ, 2021 चं चक्रीवादळ, 2021 आणि 2021 मध्ये कोविड रुग्ण आणि मृत्यू संख्येत पहिल्या क्रमांकावर आणि ही कहाणी सुरुच आहे, सर्व काही वाईटच होत आहे. असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसंच या ट्विटमध्ये शेवटी नितेश राणे यांनी 'पनवतीयों का बाप है ये बॉस' अशी टीका उद्धव ठाकरेंवर केली आहे. तौक्ते चक्रीवादळामुळं सिंधदुर्गात खूप नुकसान झालं आहे. घर, गोठे, बागा, मछिमारांचेही नुकसान झाले आहे असे समजते. आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत. कुठे कुठे नुकसान झाले आहे याचीही माहिती घेत आहोत. सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू हा विश्वास जनतेला देत असल्याचं नितेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यापूर्वीही नितेश राणे यांनी शिवसेनेवर इमेज बिल्डींगसाठी कलाकारांना पैसे देऊन ट्विट करायला लावत असल्याचा गंभीर आरोप केला होता. काही कलाकारांना थेट सेना भवनावरून फोन जातात, असंही नितेश राणेंनी म्हटलं होतं. प्रसिद्धीसाठी हे लोकांचा पैसा उधळत असून त्याची चौकशी व्हावी आणि याबाबत माहिती देण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली होती. या सर्वांची पूर्ण माहिती असून आगामी अधिवेशनामध्ये सरकारचं पितळ उघडं पाडण्याचा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Cyclone, Nitesh rane, Uddhav tahckeray

    पुढील बातम्या