'महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्याची कुवत नाही ते राम मंदिर काय उभारणार'

'महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्याची कुवत नाही ते राम मंदिर काय उभारणार'

ज्यांची शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्याची कुवत नाही ते राम मंदिर काय उभारणार अशी खरमरीत टीका काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 नोव्हेंबर : ज्यांची शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारण्याची कुवत नाही ते राम मंदिर काय उभारणार अशी खरमरीत टीका काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. ते मुंबईच्या आझाद मैदानात बोलत होते.


आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभाण्यात आला. या पुतळ्यावर छत्र उभारण्याचं आश्वासन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी ते पाळलं नाही.


त्यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर कुरघोडी करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर छत्र उभारलंय. एवढंच नाही तर, 'आम्ही दिलेले शब्द पाळतो, पहिले आमचे छत्रपती मग जाऊन करा अयोध्येत आरती' असा ट्विट करत शिवसेनेला टोलाही लावला आहे.


मुंबई विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करताना उद्धव ठाकरे म्हटले होते की, शिवाजी महाराजांना उन्हा-तान्हात एकटं उभं करून ठेवलं आहे. तुमची कुवत नसेल तर सांगा शिवसेने इथे रायगड उभा करेल.


चार मार्चला पुतळ्याचं पूजन करून शिवसेनेने शिवजयंतीही साजरी केली होती. मात्र छत्र उभारण्याचा बहुदा शिवसेनेला विसर पडला असावा. नेमकी हीच संधी साधत नितेश राणे यांनी छत्र उभारलं आणि शिवसेनेची राम मंदिर उभारण्याची कुवत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.


VIDEO : 'मर्द हो ना, चेहरा उपर करो', महिला चोराला अमानुष मारहाण


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 23, 2018 08:20 PM IST

ताज्या बातम्या