मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष शिगेला, नितेश राणेंचं शिवसैनिकांना थेट आव्हान

नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्ष शिगेला, नितेश राणेंचं शिवसैनिकांना थेट आव्हान

Shiv Sena vs BJP: शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे. नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी थेट शिवसैनिकांना आव्हान दिलं आहे.

Shiv Sena vs BJP: शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे. नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी थेट शिवसैनिकांना आव्हान दिलं आहे.

Shiv Sena vs BJP: शिवसेना विरुद्ध नारायण राणे यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचल्याचं दिसत आहे. नारायण राणेंचे चिरंजीव नितेश राणे यांनी थेट शिवसैनिकांना आव्हान दिलं आहे.

मुंबई, 24 ऑगस्ट : जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्याच दरम्यान आता मुंबईत शिवसेना विरुद्ध राणे समर्थकांत मोठा राडा होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे नितेश राणे यांनी जे ट्विट (Nitesh Rane Tweet) केलं आहे.

नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं, "असं ऐकलं की युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे अन्यथा यापुडे जे काही होईल त्याची जबाबदारी आमची नाही. सिंहाच्या हद्दीत शिरण्याचे धाडस करु नका. आम्ही तुमची वाट पाहतोय". नितेश राणे यांनी रात्रीच्या सुमारास हे ट्विट केलं आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवणार? 

राणेंविरोधात मुंबईत बॅनर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्यं केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झालेत. शिवसैनिकांनी मुंबईत दादर टी टी भागात स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचे मोठे फोटो बँनर लावून त्यावर "कोंबडी चोर !!!" असं नारायण राणेंना झोंबणारे शब्दं लिहिलेत. त्यामुळे मुंबईत वातावरण तणावपुर्ण झालंय. याचे पडसाद आणखीन तीव्र उमटण्याचीही शक्यता व्यक्तं केली जातेय.

नारायण राणेंना अटक होणार?

नाशिक सायबर पोलिसांत शिवसेनेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी नाशिक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "या गुन्ह्यात आरोपी भारत सरकारचे मंत्री असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांचे विरोधात विधान केलेले आहे. गुन्ह्याची गंभीरता व्यापकता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तात्काळ अटक करून न्यायालयासमोर उपस्थित करणे आवश्यक असल्याने, एक पोलीस उप आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमणे उपयुक्त वाटते. संजय बारकुंड पोलीस उप आयुक्त नाशिक शहर यांनी एक टीम तरयार करुन मंत्री महोदय नारायण राणे यांना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याची कार्यवाही करावी" असं नाशिक पोलिसांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात संबोधित करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यांनी हिरक महोत्सव म्हटलं. त्या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी अमृत महोत्सव असल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मग मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. यावर जन आशीर्वाद यात्रेदरम्यान चिपळूण येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

First published:
top videos

    Tags: BJP, Mumbai, Nitesh rane, Shiv sena