मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

सरकारच्या स्तुतीसाठी करीना, कतरीनाला मिळतात पैसे, सेना भवनातून फोनही जातात; नितेश राणेंचे गंभीर आरोप

सरकारच्या स्तुतीसाठी करीना, कतरीनाला मिळतात पैसे, सेना भवनातून फोनही जातात; नितेश राणेंचे गंभीर आरोप

Nitesh Rane Social Meida Campaign करिना, कतरिना, फरहान अख्रतर, दिशा पाटणी अशा सेलिब्रिटींची नाव घेत यांना पैसा देऊन सरकारच्या बाजुनं ट्विट करायला सांगितलं जात असल्याचा आरोप राणे यांनी केला.

Nitesh Rane Social Meida Campaign करिना, कतरिना, फरहान अख्रतर, दिशा पाटणी अशा सेलिब्रिटींची नाव घेत यांना पैसा देऊन सरकारच्या बाजुनं ट्विट करायला सांगितलं जात असल्याचा आरोप राणे यांनी केला.

Nitesh Rane Social Meida Campaign करिना, कतरिना, फरहान अख्रतर, दिशा पाटणी अशा सेलिब्रिटींची नाव घेत यांना पैसा देऊन सरकारच्या बाजुनं ट्विट करायला सांगितलं जात असल्याचा आरोप राणे यांनी केला.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 13 मे : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) सोशल मीडियाद्वारे इमेज बिल्डींगसाठी खर्च करण्याचा निर्णय रद्द केला. मात्र या मुद्द्यावरून नितेश राणे (Nitesh Rane) यांनी सरकार आणि शिवसेनेवर (Shivsena) गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकार प्रतिमा चांगली निर्माण व्हावी यासाठी कलाकारांना पैसे देऊन ट्विट करायला लावत असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. तर काही कलाकारांना थेट सेवा भवनावरून फोन जातात, असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

(वाचा-6 कोटींमध्ये सोशल मीडियावर प्रसिद्धी नको रे बाबा, अजितदादांकडून अखेर निर्णय रद्द)

उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या कारभाराची माहिती लोकांना व्हावी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिमा सुधारावी म्हणून सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी 6 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय नुकताच झाला होता. ही बातमी समोर आल्याने एकच टीका सुरू झाली. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय मागे घेतला. पण यावरून जेव्हा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली तेव्हा नितेश राणे यांनी शिवसेना आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकार सेलिब्रिटींची मदत घेऊन पीआर कॅम्पेन राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी

नितेश राणे म्हणाले की, केवळ उपमुख्यमंत्रीच नाही तर सरकारच अशाप्रकारे सेलिब्रिटींचा वापर करत आहे. प्रत्येकजण अचानकपणे आदित्य ठाकरे हिरो आहे, असे का म्हणू लागला आहे. प्रसिद्धीसाठी हे लोकांचा पैसा उधळत असून त्याची चौकशी व्हावी आणि याबाबत माहिती देण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

(वाचा-पप्पू यादव ठरले मित्राच्या प्रेमातील व्हिलन, 32 वर्षांपुर्वीच्या अपहरणाची कहाणी)

एका पीआर एजन्सीच्या माध्यमातून बड्या सेलिब्रिटींना राज्य सरकारची प्रतिमि सुधारण्यासाठी ट्विट करायला सांगितलं जात असल्याचं नितेश राणे म्हणाले. करिना, कतरिना, फरहान अख्रतर, दिशा पाटणी अशा सेलिब्रिटींची नाव घेत यांना पैसा देऊन सरकारच्या बाजुनं ट्विट करायला सांगितलं जात असल्याचा आरोप राणे यांनी केला. काही सेलिब्रिटींना तर शिवसेना भवनातून फोन जात असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे. या सर्वांची पूर्ण माहिती असून आगामी अधिवेशनामध्ये सरकारचं पितळ उघडं पाडण्याचा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.

अशा प्रकारे सेलिब्रिटींना ट्विट करायला लावण्यासाठी लाखो रुपये उधळले जात असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय. काही छोट्या कलाकारांना 2 ते तीन लाख रुपये दिले जातात. पण बड्या कलाकारांना 10 ते 15 लाक किंवा अधिक पैसे दिले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हा सर्व कर भरणाऱ्या नागरिकांचा पैसा आहे, सरकार तो असा उधळपट्टी करत अस्लयाचं नितेश राणे म्हणाले. त्यामुळं राणे यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे आगामी अधिवेशनात ते याबाबत नेकमी काय माहिती मांडतात आणि सरकार किंवा शिवसेना त्यांना कसे उत्तर देणार हे पाहंव लागणार आहे.

First published:

Tags: Nitesh rane, Shivsena, Social media, Twitter