Home /News /mumbai /

आझाद मैदानावर मराठा मोर्चेकऱ्यांचा नितेश राणेंना घेराव

आझाद मैदानावर मराठा मोर्चेकऱ्यांचा नितेश राणेंना घेराव

आझाद मैदानावर पोहोचलेल्या काँग्रेसचे आमदार नितेश राणेंना मोर्चेकऱ्यांनी घेराव घातला होता. यावेळी राणे आणि मोर्चेकऱ्यांमध्ये वादही झाला.

09 आॅगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक झाल्यानंतर आझाद मैदानावर पोहोचलेल्या काँग्रेसचे आमदार नितेश राणेंना मोर्चेकऱ्यांनी घेराव घातला होता. यावेळी राणे आणि मोर्चेकऱ्यांमध्ये वादही झाला. मराठा मोर्चात राजकीय नेत्यांना आतापर्यंत बंदी घालण्यात आली होती. पण पहिल्यांदाच काँग्रेसचे नेते नितेश राणे मराठा मोर्चाच्या व्यासपीठावर दिसले. खुद्द खासदार युवराज संभाजीराजे यांनीच नितेश राणे यांना व्यासपीठावर घेऊन गेले होते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मराठा समाजाच्या शिष्टमंडळातील मुलींनी त्या घोषणा सर्वांना वाचून दाखवल्यात. मात्र, काही मोर्चेकऱ्यांना या घोषणा मान्य झाल्या नाहीत असं चित्र निर्माण झालं. आझाद मैदानावर उपस्थिती असलेले आमदार नितेश राणेंना मोर्चेकऱ्यांनी घेराव घातला. सरकारनं ठोस आश्वासन दिलेलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. यावेळी मोर्चेकरी आणि नितेश राणे यांच्यामध्ये वादही झाला. या वादानंतर मोर्चातून वाट काढत नितेश राणे आझाद मैदानातून बाहेर पडले.
First published:

Tags: Nitesh rane, नितेश राणे

पुढील बातम्या