Home /News /mumbai /

चक्रीवादळाचा धोका टळला आणि कोरोनाविषयीही मुंबईतून पहिल्यांदाच आली दिलासादायी बातमी

चक्रीवादळाचा धोका टळला आणि कोरोनाविषयीही मुंबईतून पहिल्यांदाच आली दिलासादायी बातमी

मुंबईकरांसाठी एकाच वेळी दोन आनंदाच्या बातम्या आहेत.

    मुंबई, 03 जून : कोरोनाव्हायरस (coronavirus) आणि त्यात निसर्ग चक्रीवादळाचं (nisarga cyclone) संकट. मुंबईकर (mumbai) आपला जीव मुठीत घेऊनच घरात बसले होते. इतके दिवस कोरोनाशी दोनहात करणारे मुंबईकर चक्रीवादळाचाही सामना करण्यासाठी तयार झाले. मात्र सुदैवानं चक्रीवादळाचं संकट टळलं आणि सोबतच कोरोनाबाबतही दिलासादायक बातमी आली. मुंबईतील कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकरणांचं प्रमाण आता कमी झालं आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीचा दर आता कमी झाला आहे, असं मुंबई महापालिकेच्या आकडेवारीतून दिसून येतं आहे. आठवडाभरापूर्वी म्हणजे 27 मे रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत नवीन कोरोना रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर 5.17% होता. जो 2 जूनला 3.64% झाला आहे. याचा अर्थ मुंबईत दररोज नवीन रुग्ण आढळण्याचं प्रमाण आता कमी झालं आहे. हे वाचा - मूकबधीर महिलेला घरचा पत्ताही सांगता येईना, मग पालकमंत्र्यांनी असा लावला शोध महाराष्ट्रामध्ये मुंबई कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित आहे. मुंबईत सर्वाधिक रुग्ण आहेत आहेत. आज  मुंबईत कोरोनाव्हायरसच्या एकूण 43,492 रुग्णांची नोंद आहे. त्यापैकी 24,597 सक्रिय रुग्ण आहेत. 17,472 रुग्ण बरे झालेत आणि 1,417 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील रिकव्हरी रेटही वाढला राज्यात आज 2560 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 74,860 झाली आहे. 32,326 कोरोना रुग्ण ठीक झालेत. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, राज्यामध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मार्चच्या तुलनेत मेमध्ये सुमारे साडेतीन पटीने जास्त रुग्ण बरे झालेत. रुग्ण बरे होण्याचा दर 43.35% एवढे झाले आहे. गेल्या तीन महिन्यांची आकडेवारी पाहता मेमध्ये सर्वाधिक रुग्ण बरे झालेले दिसून येत आहेत. यासोबतच राज्यातील रुग्ण दुपटीचा कालावधी 11 वरून 17.5℅ दिवसांवर गेला आहे. संपादन - प्रिया लाड हे वाचा - तब्बल 2 महिन्यांनंतर घरी आली कोरोना योद्धा आई; मुलींनी काय केलं पाहा VIDEO
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या