एक वादळ आणि मुंबईत चमत्कार, अनेक वर्षांनी पहिल्यांदाच घडला असा प्रकार

एक वादळ आणि मुंबईत चमत्कार, अनेक वर्षांनी पहिल्यांदाच घडला असा प्रकार

वारा आणि पावसामुळे एक्यूआय सुधारला आहे. शुक्रवारी, एक्यूआय 15 वर राहील अशी आशा व्यक्त केली आहे.

  • Share this:

मुंबई, 05 जून :अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका कोकण किनारपट्टीला बसला. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात नुसकसान झालं. या निसर्ग वादळाचा एक चांगला परिणाम मुंबईवर झालेला पाहायला मिळाला. या वर्षी पहिल्यांदाच मुंबईत प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्यानं हवा खूप शुद्धही झाली. कोरोनामुळे 72 दिवस असलेला लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतील एअर क्वालिटी इंडेक्स 17 वर पोहोचला आहे.

या एअर क्वालिटी इंडेक्समध्ये 0 ते 50 पर्यंतची चांगली मानली जाते. 51 ते 100 पर्यंत समाधानकारक, तर 101 ते 200 आणि त्याहून अधिक मध्यम हानिकारक मानले जाते. मुंबईत साधारणतः आतापर्यंत हवेची गुणवत्ता 500च्या नोंदवण्यात आली होती. मात्र लॉकडाऊन आणि चक्रीवादळानंतर ही गुणवत्ता थेट 500वरून 17 वर आली आहे.

हे वाचा-पेनकिलरमुळे महिलेच्या शरीराची झाली आग; कल्पनाही करणार नाही अशी झाली अवस्था

डॉ. गुफरान यांच्या म्हणण्यानुसार 2020 मुंबईनं हा विक्रम केला आहे. निसर्ग चक्रीवादळ येण्याआधी हवा इतकी शुद्ध नव्हती. वादळानंतर हवेची गुणवत्ता सुधारल्याचा दावा केला आहे. वारा आणि पावसामुळे एक्यूआय सुधारला आहे. शुक्रवारी, एक्यूआय 15 वर राहील अशी आशा व्यक्त केली आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार गुरुवारी दुपारपर्यंत निसर्ग चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. पण त्याचा परिणाम म्हणून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीही साचलं होतं. मात्र निसर्ग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर मुंबईची गुणवत्ता सुधारल्याचा दावा केला आहे.

हे वाचा-कोरोनाबाधितांची लूट, अव्वाच्या सव्वा बिल आकारणारे हॉस्पिटल सरकारच्या रडारवर

First published: June 5, 2020, 3:21 PM IST

ताज्या बातम्या