मेट्रो कारशेडबाबत निरुपमांचे आरोप फक्त प्रसिद्धीसाठी, मुख्यमंत्री कार्यालयाचा पलटवार

वस्तुस्थिती समजून न घेता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी हे आरोप आहेत अशी टीकाही करण्यात आलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2017 09:39 PM IST

मेट्रो कारशेडबाबत निरुपमांचे आरोप फक्त प्रसिद्धीसाठी, मुख्यमंत्री कार्यालयाचा पलटवार

22 आॅगस्ट : काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी मेट्रो कारशेडच्या जागेसंदर्भात अतिशय धादांत खोटे आणि मुख्यमंत्र्यांची नाहक बदनामी करणारे आरोप केले आहेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाने दिलंय. तसंच वस्तुस्थिती समजून न घेता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी हे आरोप आहेत अशी टीकाही करण्यात आलीये.

काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुंबई मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 हजार कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप केलाय. मेट्रोच्या कारशेडसाठी फक्त 12 हेक्टर जागा लागते. पण मुख्यमंत्र्यांनी 30 हेक्टर जागेची मंजुरी दिली उरलेली 18 हेक्टर हे बिल्डराच्या घश्यात घालण्याचा आरोपही निरुपम यांनी केला.

निरुपम यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने यावर स्पष्टीकरण देत टीका केलीये.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण

1. आरे कारशेडच्या जागेवर कुठलाही व्यावसायिक वापर नियोजित नाहीत. संपूर्ण 30 हेक्टर जागा ही मेट्रो कारशेडसाठी वापरली जाणार आहे.

Loading...

2. या 30 हेक्टर जागेत 5 हेक्टर हा ग्रीनपॅच आहे. त्याला कुठलीही बाधा न येता तो तसाच ग्रीनपॅच राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कारडेपोसाठी वापरण्यात येणारी जागा ही 25 हेक्टर इतकीच आहे.

3.  निरूपम यांनी आरोप केल्याप्रमाणे यातील कोणतीही जागा वनविभागाची नाही, तर ती दुग्धविकास विभागाची आहे. वनविभागाने राष्ट्रीय हरित लवादाकडे एक प्रतिज्ञापत्र सादर करून ही आमची जागा नाही, असे स्पष्ट केलं आहे.

4. या जागेला मान्यता 3 मार्च 2014 रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेतील मंत्रिमंडळाने दिली. यात कारडेपो आरे येथेच राहील, याही निर्णयाचा समावेश होता. या जागेचा ताबा ऑगस्ट 2014 मध्ये देण्यात आला, त्याही वेळी विद्यमान सरकार सत्तेत नव्हते.

5. या 30 हेक्टर जागेचा वापर पुढीलप्रमाणे आहे : डेपो परिसर : 21 हेक्टर, अप्रोच लाईन्स आणि डेपो स्टेशनसाठी 4 हेक्टर, ग्रीनपॅच : 5 हेक्टर (एकूण 30 हेक्टर)

6. यापैकी एकही इंच जागेचा कुठल्याही प्रकारे व्यावसायिक वापर होणार नसल्याने एफएसआय वगैरे आरोप हे निव्वळ हास्यास्पद आहेत.

7. मुंबई मेट्रो 3 हा 33.5 कि.मीचा मार्ग आहे. त्यावर सुरूवातीच्या काळात 8 डब्याच्या 35 आणि नंतरच्या काळात 8 डब्याच्या 55 मेट्रो धावणार असल्याने या 30 हेक्टर जागेची आवश्यकता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 09:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...