S M L

निरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला-सुशांत माळवदे

आयबीएनलोकमतला दिलेल्या मुलाखतीत हा हल्ला ठरवून झाला असल्याचं माळवदे यांनी सांगितलं आहे. या हल्ल्यामागे संजय निरूपम यांचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लाठ्या काठ्या इमारतीत आधीपासूनच लपवून ठेवले असल्याची माहिती सुशांत माळवदे यांनी दिली आहे

Chittatosh Khandekar | Updated On: Nov 4, 2017 05:40 PM IST

निरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला-सुशांत माळवदे

मुंबई,04 नोव्हेंबर: मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांच्या चिथावणीमुळेच माझ्यावर हल्ला झाल्याचा सनसनाटी आरोप मनसेचे मालाड विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी काही फेरीवाल्यांनी सुशांत माळवदेंवर हल्ला केला होता.

आयबीएनलोकमतला दिलेल्या मुलाखतीत हा हल्ला ठरवून झाला असल्याचं माळवदे यांनी सांगितलं आहे. या हल्ल्यामागे संजय निरूपम यांचा हात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी लाठ्या काठ्या इमारतीत आधीपासूनच लपवून ठेवले असल्याची माहिती सुशांत माळवदे यांनी दिली आहे.

सुशांत माळवदे हे मालाड स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले होते त्यावेळी फेरीवाल्यांनी लाठ्या काठ्यांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतरच मनसे आणि फेरीवाले आणि मनसे पुन्हा आमनेसामने आलेत.सध्या मुंबईत मनसेची फेरीवाला विरोधी मोहीम सुरू आहे. अनेक ठिकाणाहून फेरीवाल्यांना मनसेने मुंबईत हटवले आहे.यातच काही दिवसांपूर्वी काही फेरीवाल्यांनी सुशांत माळवदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यावर सगळीकडूनच टीकेची झोड उठली होती. याआधीच मनसेनेही या हल्ल्यामागे निरूपम यांचा हात असल्याचा आरोप केला होता. माळवदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2017 05:25 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close