निलेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका, म्हणाले...

निलेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका, म्हणाले...

मुख्यमंत्रिपदावरून राज्यात युतीचे बिनसल्यानंतर शिवसेनचे एकमेव केंद्रीय मंत्री यांच्यासह सहा खासदारांनी राजीनामा दिला आहे.

  • Share this:

मुंबई,19 डिसेंबर: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर ट्वीट करत खोचक टीका केली आहे. 'काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा करायची आणि दिल्लीत एनडीएची बैठक नाकारायची.. संजय राऊत हे गल्लीतल्या कुसक्या म्हाताऱ्यासारखे आहेतय जे सगळे ठीक असले तरीही सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालत बसतात, असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यात सत्तास्थापनेवरून शिवसेना-भाजप युतीत फूट पडली आहे. मुख्यमंत्रिपदावरून राज्यात युतीचे बिनसल्यानंतर शिवसेनचे एकमेव केंद्रीय मंत्री यांच्यासह सहा खासदारांनी राजीनामा दिला आहे. शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसल्याचे भाजप नेत्याकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच शिवसेना खासदारांची लोकसभा आणि राज्यसभेतही वेगळी आसनव्यवस्था करण्यात आली आहे. यावर संजय राऊत यांनी 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपवर हल्ला चढवला आहे. आम्हाला एनडीएतून काढणारे तुम्ही कोण असा थेट सवाल सेनेने केला आहे. आम्ही एनडीएत नसल्याची घोषणा कशाच्या आधारावर आणि कुणाच्या परवानगीने केली, असेही विचारणा केली आहे. एनडीएच्या जन्मकळा आणि बाळंतपणाच्या वेदना शिवसेनेने अनुभवल्या असून ज्यांनी ही घोषणा केली त्यांना सेनेचे मर्म आणि एनडीएचे कर्म माहिती नसल्याचा टोलाही लगावला आहे.

शिवसेनेची काँग्रेसशी जवळीक वाढली अशी चर्चा भाजपच्या गोटात चालली आहे. पण असे काही होत असेल तर एनडीएने त्यावर बैठक बोलावली पाहिजे. यावर चर्चा करून शिवसेनेवर आरोपपत्र का ठोकले नाही, असा सवालही अग्रलेखात केला आहे.

लवकरच महाशिवाआघाडी अस्तित्वात येईल..

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मुरब्बी नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आत्ताच अनुमान लावणे चुकीचे आहे. मात्र, लवकरच महाशिवआघाडी अस्तित्वात आलेली पाहायला मिळेल, असं मोठं वक्तव्य काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा संभ्रम आणखी वाढला आहे. 'काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत चर्चा झाली नाही. शिवसेनेसोबतही किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार झालेला नाही,' असे म्हणत शरद पवार यांनी खळबळ उडवून दिली होती.

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या दिल्लीतल्या भेटीकडे महाराष्ट्राची नजर होती. राज्यात सरकार स्थापन होणार का, कधी होणार, कुणाचे होणार, शिवसेनेला साथ द्यायला काँग्रेस-राष्ट्रवादी तयार आहेत का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या भेटीनंतर मिळतील अशी अपेक्षा होती. पण सत्तास्थापनेचा पेच सुटण्यापेक्षा अधिकच वाढला आहे. सोनिया गांधींच्या भेटीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी आमची फक्त राजकीय परिस्थितीविषयी आपापसात चर्चा झाली आहे. कुठलाही निर्णय किंवा चर्चेआधी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप अशा मित्रपक्षांबरोबर चर्चा आवश्यक आहे, असे शरद पवार यांनी म्हटले. शिवसेनेविषयी आमच्यात काहीच चर्चा झाली नाही, असे शरद पवार म्हणाले.

Published by: Sandip Parolekar
First published: November 19, 2019, 3:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading