प्रतोदांची लाॅटरी ; राज पुरोहित,नीलम गोऱ्हेंना लाल दिवा

प्रतोदांची लाॅटरी ; राज पुरोहित,नीलम गोऱ्हेंना लाल दिवा

या प्रतोदांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला जाणार आहे. या बद्दल विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलंय.

  • Share this:

05 एप्रिल : भाजप आणि शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांची आता आणखी शान वाढणार आहे. या प्रतोदांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा मिळणार आहे. या प्रतोदांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला जाणार आहे. या बद्दल विधानसभेत विधेयक मंजूर करण्यात आलंय. मात्र सत्ताधारी पक्षाच्या प्रतोदांना याचा फायदा घेता येणार आहे.

सत्तेतील नाराज आमदारांना खूश करण्यासाठी फडणवीस सरकारने पाऊल उचलले आहे. मुख्य प्रतोदाना थेट कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. भाजपचे राज पुरोहित यांना लाल दिवा मिळणार आहे. तर शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनाही लाल दिवा मिळणार आहे. तसंच शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनाही हा दर्जा मिळणार आहे.

लाल दिवा कुणाला मिळणार

- राज पुरोहित, भाजप

- सुनील प्रभू, शिवसेना

- विजय गिरकर, भाजप

- डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना  

कुणाला नाही

- शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस

- हेमंत टकले - राष्ट्रवादी काँग्रेस

- संजय दत्त - काँग्रेस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 5, 2017 06:43 PM IST

ताज्या बातम्या