मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कोरोनाशी चर्चा केली का? Night Curfew वरून इम्तियाज जलील यांनी डागली तोफ

कोरोनाशी चर्चा केली का? Night Curfew वरून इम्तियाज जलील यांनी डागली तोफ

'कोरोनाने तुम्हाला कधी सांगितलं की, तो दिवसा आराम करेन आणि रात्री बाहेर निघेन?'

'कोरोनाने तुम्हाला कधी सांगितलं की, तो दिवसा आराम करेन आणि रात्री बाहेर निघेन?'

'कोरोनाने तुम्हाला कधी सांगितलं की, तो दिवसा आराम करेन आणि रात्री बाहेर निघेन?'

मुंबई, 23 डिसेंबर: ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (New strain of virus in UK) आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनी राज्यात महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी (Night curfew) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jaleel)आक्रमक झाले आहेत.

'कोरोनाने तुम्हाला कधी सांगितलं की, तो दिवसा आराम करेन आणि रात्री बाहेर निघेन?' असा खोचक सवाल देखील खासदार जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा...मराठा आरक्षणाचा मुद्दा शमत नाही तोच कुणबीविरूद्ध ओबीसी वाद पेटण्याची चिन्हे

राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री 11 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान संचारबंदी जाहीर केली आहे. या निर्णयावर खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, राज्य सरकार असा निर्णय का घेत आहे, कळत नाही. युकेहून येणाऱ्या फ्लाईट रोखल्या हे मान्य आहे. मात्र, प्रवाशांना 14 दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन होण्याबाबत सक्ती करण्यात आली आहे. हॉटेलचं बिल हे प्रवाशांनाच भरायचं आहे. लोकांकडे पैसे नाहीत. ते हॉटेल्समधील वास्तव्याचे पैसे कसे भरणार? असा सवाल देखील खासदार जलील यांनी उपस्थित केला आहे.

काही आमदार पैसे घेऊन विधानसभेत विचारतात प्रश्न....

विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा खळबळजनक आरोप देखील खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून काही आमदार पैसे घेतात. त्यानंतर विधानसभेत प्रश्न मांडतात, असंही त्यांनी सांगितलं.

खासदार जलील म्हणाले, एलएक्युच्या नावाखाली काही आमदार असा प्रकार करतात. ही बाब अनेकांना माहिती आहे. राजकिय पक्षांना माहिती आहे. मात्र, कुणीही समोर येऊन यावर बोलत नाही, असा दावा देखील त्यांनी केला.

विधानसभा अध्यक्ष माझ्याकडे लिखित तक्रार दाखल करण्यास सांगत असतील तर मी देईन, असंही खासदार जलील यांनी सांगितलं आहे. मात्र त्यानंतर याबाबत सखोल चौकशी करण्याची जबाबदारी सरकार आणि विधानसभा सचिवांची आहे.

हेही वाचा...शरद पवारांनी पुढाकार घ्यावा, मेट्रो कारशेडच्या वादावर सेनेच्या मंत्र्याची मागणी

खासदार जलील म्हणाले, मी जेव्हा एक एलएक्यु टाकला होता. तेव्हा एका सिटी सर्व्हे ऑफिसरनं माझी भेट घेतली होती. तेव्हा ही बाब ऑन रेकॉर्ड सांगितली होती, असं खासदार जलील यांनी सांगितलं.

First published:
top videos

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Udhav thackarey