Home /News /mumbai /

'भाईं'चा इलाका पाण्यात बुडाला,मदतीला कुणी नाही आलं !

'भाईं'चा इलाका पाण्यात बुडाला,मदतीला कुणी नाही आलं !

मुंबईच्या नालासोपारा आणि वसई-विरार भागात गेल्या तीन दिवसांपासून दहा लाखांहून अधिक लोक पाण्यामुळे अस्वस्थ आहेत.

    संदीप सोनवलकर मुंबई, 12 जुलै : मुंबईच्या नालासोपारा आणि वसई-विरार भागात गेल्या तीन दिवसांपासून दहा लाखांहून अधिक लोक पाण्यामुळे अस्वस्थ आहेत. तीन दिवसांपासून मुंबईत सुमारे 350 मिलीमीटर इतका पाऊस पडला आणि त्यामुळे नालासोपारा, वसई-विरारच्या संपूर्ण भागात पाणी साचलं. त्यानंतर रेल्वेने सगळ्या लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्या होत्या. अतिवृष्टीमुळे विद्यूत विभागातही पाणी गेलं आणि त्यामुळे 3 दिवस वीजही कापण्यात आली. सगळ्यात गंभीर म्हणजे पाणी साचल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद ठेवण्यात आला होता. एवढं सगळं केलं पण साचलेलं पाणी काही ओसरलं नाही. नालासोपारा, वसई-विरारची संपूर्ण लोक आताही या पाण्यात अडकलेली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मंगळवार आणि बुधवारी प्रशासनाने ट्रेनमध्ये अडकलेल्या 1500 लोकांना आणि घरांमध्ये अडकलेल्या 500 लोकांना सुखरूप बाहेर काढलं. पण शहराचं स्वीमिंग पूल झालेल्या आणि त्यात गेले तीन दिवस जीवन-मरणाची नौका सांभाळणाऱ्या त्या 10 लाख लोकांसाठी काहीही केलं जात नाही. या सगळ्यामुळे या लोकांचा आता सरकारवरचा विश्वास तुटला आहे. खरंतर वसई-विरार आणि नालासोपार हे मुंबईच्या मध्यमवर्गीयांसाठी एक नवं ठिकाण आहे. स्वस्त घरं आणि वाहतूकीच्या योग्य सुविधा असल्यामुळे मुंबईतील तब्बल 10 लाख लोक या परिसरात राहतात. मोठी स्वप्न दाखवत बिल्डरांनी घरं विकली, त्यानंतर महापालिका आली खरी पण त्याने कोणत्याही सुविधा मिळाल्या नाही. इथे बऱ्याच इमारती या ग्रामीण आदिवास्यांच्या जमिनींवर उभारल्या आहेत. त्यामुळे त्यांना पाणी पुरवठा हा टँकरने होतो आणि वीजही चोरून वापरावी लागते. पण या सगळ्यात प्रश्न असा काही नेमकं शहरात पाणी भरलं कसं. तर याची दोन मोठी कारणं आहेत. पहिले तर वसई-विरारचा पश्चिम भाग समुद्रालगत आहे. त्यात खाडीच्या जागेवर भर टाकून तिथं काँक्रिटीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे आता पाणी जाण्यासाठी खाडी काही उरली नाही. दुसरीकडे नालासोपारा पूर्व भागात मिठाघरं होती. ती काढून आता त्या जागीही इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारतींपासून खाडी इतकी जवळ आहे की यात इमारती बनवण्याच्या नादात खाडीलगतची पाणी शोषून घेणारी खारपुटीची जंगलंही कापण्यात आली आणि आता तिथे कचरा टाकण्यात येतो. या परिसरालगत असलेल्या सुर्या धरणाचं पाणी जर सोडलं गेलं तरी या परिसरात पाणी भरू शकतं. पण या सगळ्या चुकीच्या आखणीमुळे आता पाणी काही ओसरायला मागत नाही आहे. शहराचा विकास करताना या सगळ्या गोष्टींचा विचार न केल्यामुळे इथल्या नागरिकांवर आता ही वेळ आली आहे. या सगळ्यात आता राजकारणावर बोलायचं झालं तर या परिसरात दबंग आणि गुन्हेगारी पार्वश्वभूमी असलेले हितेंद्र म्हणजेच भाई ठाकूर यांची दहशत आहे. 3 विधानसभा आणि वसई-विरारच्या महानगरपालिकेवर त्यांचा हात आहे. कधी नव्हे ते भाजपने लोकसभा पोटनिवडणुका जिंकल्या त्याही भाई ठाकूर यांच्या जीवावर. इथे राहणारा गरीब आणि कामगार वर्ग कधीही भाईच्या विरोधात बोलणार नाही हे त्यांना माहित आहे. त्यामुळेच आज संपूर्ण शहर पाण्याखाली आहे.
    First published:

    Tags: Mumbai rain, Vasai, Virar, Water

    पुढील बातम्या