मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

‘News18 लोकमत’ Impact: आत्महत्येची परवानगी मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अखेर मिळणार न्याय!

‘News18 लोकमत’ Impact: आत्महत्येची परवानगी मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला अखेर मिळणार न्याय!

'पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. मानवतेच्या भूमिकेतून त्यांच्या मागणी मान्य करण्यात आलेली आहे.'

'पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. मानवतेच्या भूमिकेतून त्यांच्या मागणी मान्य करण्यात आलेली आहे.'

'पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्येचा विचारही मनात आणू नये. मानवतेच्या भूमिकेतून त्यांच्या मागणी मान्य करण्यात आलेली आहे.'

मुंबई 12 ऑगस्ट: आजारपणावरच्या उपचारासाठी मुंबईला बदली मागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला आता अखेर न्याय मिळणार आहे. राष्ट्रपती पदक विजेत्या राकेश साळुंखे या अधिकाऱ्याची व्यथा ‘News18 लोकमत’ने मांडली होती. त्यानंतर संबंधित सर्वच यंत्रणा जागी झाली आणि मानवतेच्या भूमिकेतून राकेश साळुंखे यांची बदली लवकरात लवकर केली जाणार असल्याचं आश्वासन त्यांना देण्यात आलं. यासंबंधात तातडीने बदलीसाठीची प्रक्रिया सुरु करणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी ‘News18 लोकमत’शी बोलतांना दिली. सरकारी कारभाराला कंटाळलेल्या साळुंखे या पोलीस अधिकाऱ्याने सरकारकडे कुटुंबासह आत्महत्येची परवानगी मागितल्याने खळबळ उडाली होती. आपली पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्येची परवानगी त्यांनी मगितली होती. साळुंखे यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे. ते गेली 2 वर्षे फक्त बदली हवी म्हणून असंख्य अर्ज करणाऱ्या आणि प्रत्येक वेळी बदलीच्या ऑर्डर मध्ये त्यांना डावलण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं होतं. हे अधिकारी हे राज्य उत्पादन शुल्क विभागात सब  इंस्पेक्टर आहे. 5 वाजता TV डिबेट.. 7.30 वाजता आला हार्ट अटॅक; नेत्याचा शेवटचा VIDEO VIRAL मुंबईत 2006च्या ट्रेन मधील साखळी बॉम्बस्फोटाच्या वेळी या अधिकाऱ्याने महत्त्वाची कामगिरी बजावली होती. माहीममध्ये याच बॉम्बस्फोटात ते जखमीही झाले होते. अशा अवस्थेत त्यांनी पाच लोकांचे प्राण वाचवले होते. उत्पादन शुल्क विभागात काम करणाऱ्या या अधिकाऱ्याला राष्ट्रपती पदक जीवन रक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. याच वेळी त्यांच्या मणक्यांना गंभीर आजार झाला होता. 2016 मध्ये अमरावतीला आणि त्यानंतर  औरंगाबादला त्यांची बदली करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या उपचारातही खंड पडला होता त्यानंतर साळुंखे यांनी असंख्य अर्ज केले आणि आपल्या वरिष्ठांच्या असंख्य भेटीगाठी घेत त्यांची मुंबईला बदली करण्याची विनंती केली. पण ती मान्य झाली नाही. मुंबईत उपचारासाठी घ्यावी लागणारी बिनपगारी रजा, उपाचारावर होणारा खर्च, औरंगाबादेत आणि मुंबईत परिवारासाठीचा खर्च या सगळ्यांचा ताळमेळ बांधताना राकेश यांना नाकी नऊ आलेत होते. निवासी डॉक्टरांसाठी Good News, कोरोना विरुद्ध लढत असतांनाच वेतनात झाली मोठ वाढ नियमानुसार बदली होणं अपेक्षित असतानाही आपला विचार केला गेला नाही म्हणून राकेशनी थेट आपल्या वरिष्ठांच्याकडेच आत्महत्येची परवानगी मागितली. आणि असं का हा जाबही विचारला. पण परिस्थितीत काहीही बदल झाला नाही. राकेश यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. नियमात बसत असताना, मुंबईत बदलीसाठी 40 जागा असतानाही जर आपला विचार का होत नाही असा प्रश्न त्यांनी केला होता. त्यांची ही व्यथा दाखवल्यामुळे अखेर त्यांना न्याय मिळाला.
First published:

Tags: Police

पुढील बातम्या