News18 Lokmat Impact : बंद पडलेले कोविड सुरू झाले अन् 4 रुणांना मिळाले बेड!

News18 Lokmat Impact : बंद पडलेले कोविड सुरू झाले अन् 4 रुणांना मिळाले बेड!

खरंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने हे आधीच सुरू केले असते तर ठाण्यातील आरोग्य यंत्रणेवर इतका ताण आला नसता...

  • Share this:

ठाणे, 21 एप्रिल : कळवा, मुंब्रा, दिवा (Diva) याचबरोबर डोंबिवली (Dombivali) आणि कल्याण, बदलापूर, अंबरनाथ या भागातील कोरोनाबाधित रुग्णांना कोविड-19 च्या पहिल्या लाटेत वरदान ठरलेले मुंब्रा कौसा येथील तब्बल सहाशे खाटांचे मिनी जम्बो कोविड सेंटर (Mumbra Kausa Mini Jumbo Covid Center)पुन्हा सुरू करण्यात आले आहे.  News 18 लोकमतच्या बातमीनंतर ठाणे महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आणि अवघ्या 48 तासातच मुंब्रा कौसा कोविड सेंटर ठाणे महानगर पालिका प्रशासनाने सुरू केले. सुरू करताच अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी असलेल्या व्हेंटिलेटरचा वापर करून 4 कोरोनाबाधित रुग्णांना तात्काळ या कोविड 19 सेंटर मध्ये दाखल करण्यात आले.

एकीकडे ठाणेकरांना एका एका बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रास होतोय असं असताना ठाणे महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक covid-19 बाधित रुग्णांना बेड पासून वंचित राहावं लागतंय. पण अत्याधुनिक सुविधांनी युक्त आणि पहिल्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांना दिलासा देणारे मुंब्रा कौसा येथील कोविड 19 सेंटर ठाणे महानगरपालिकेने बंद ठेवले होते.

35 हजारात remdesivir injection चे इंजेक्शन, वसईत धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश

News 18 लोकमतने धूळ खात पडलेल्या मुंब्रा कौसा कोविड सेंटरचे धक्कादायक वास्तव महाराष्ट्रा समोर आणले आणि राज्यातील जनतेने हे वास्तव पाहून संताप व्यक्त केला. त्याचाच परिणाम म्हणून अवघ्या 48 तासातच धूळ खात पडलेले मुंब्रा कौसा कोविड 19सेंटर सुरू करण्यात आले.

शाहिद कपूर पुन्हा एकदा झळकणार पौराणिक चित्रपटात; 'कर्ण'च्या भूमिकेत दिसणार?

पण नियोजना अभावी मुंब्रा कौसा येथील covid-19 सेंटर दुर्लक्षित राहिले होते. पण आता News 18 लोकमतच्या दणक्यानंतर ते कोड सेंटर सुरू करण्यात आले असून त्या कोविड 19 सेंटरचा ठाणेकरांसोबतच इतरांनाही फायदा होणार आहे.

Published by: sachin Salve
First published: April 21, 2021, 7:39 AM IST
Tags:

ताज्या बातम्या