न्यूज 18 लोकमतची दशकपूर्ती, दहा वर्षं पत्रकारितेची !

न्यूज 18 लोकमतची दशकपूर्ती, दहा वर्षं पत्रकारितेची !

बातमीची विश्वासहर्ता हीच आमची ताकद राहिलीय. किंबहुना त्याच्याच बळावर आम्ही प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम मिळवलं आहे. तुम्ही आमच्यावर ठेवलेल्या याच विश्वासाबद्दल सर्व प्रेक्षकांचे शतशः आभार....

  • Share this:

मुंबई, 06 एप्रिल : न्यूज18 लोकमतला आज दहा वर्षं पूर्ण होताय. निर्भीड पत्रकारितेचा वसा जपत न्यूज18 लोकमतने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गेल्या 10 वर्षात अनेक स्थित्यंतरं झाली. तरीही आम्ही निर्भीड आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा वसा कधीच टाकला नाही, बातमीची विश्वासहर्ता हीच आमची ताकद राहिलीय. किंबहुना त्याच्याच बळावर आम्ही प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम मिळवलं आहे.

6 एप्रिल 2008 मराठी पत्रकारीतेच्या इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं. आयबीएन-लोकमत...आता न्यूज 18 लोकमत.. रिजनल चॅनलच्या भिंतीं मोडत न्यूज18-लोकमतने आपली वाटचाल सुरू केली. अचूक बातमी देताना विश्वासर्हता जपली. आणि घडामोडींवर ठाम मतंही दिलं. राजकारण ते समाजकारण आणि क्रिकेट ते बॉलिवूड प्रत्येक बातमी...अचूक आणि ठाम..लोकसभा निवडणूक असो की महापालिकांचा महासंग्राम न्यूज 18 लोकमतने दिले अचूक अंदाज...निवडणुकीचे परिपूर्ण कव्हरेज देत न्यूज 18 लोकमत ठरलं नेहमी आघाडीवर राहिलं. मुख्यमंत्री बदलाची नांदी. आणि कोण होणार नवा मुख्यमंत्री पहिली बातमी दिली न्यूज 18 लोकमतने..बजेट...बजेटचे परिणाम तज्ज्ञांची मतं, अर्थमंत्र्यांचं किचकट बजट आम आदमीला समजेल उमजेल अशा सोप्या भाषेत सांगितलं..

बातम्या देत्याना आम्ही जपली सामाजिक बांधीलकीही..समाजाच्या वाईट रुढींवर चढवला घणाघाती हल्ला. राजकारण, समाजकारण किंवा अर्थकारण असेल, यातल्या प्रत्येक बातमीमागील बातमी तुमच्यापर्यंत आम्ही पोहचवला. आमच्या या प्रयत्नांवर पुरस्काराची मोहरही उमटली. आतापर्यंत दहावर्षांची यशस्वी वाटचाल आम्ही केली ती तुमच्या पाठबळाच्या जोरावर...अकराव्या वर्षात आम्ही पाऊल टाकतोय ते तुम्हा प्रेक्षकांच्या प्रतिसाद आणि पाठिंब्याच्या जोरावरचं...

आम्ही निर्भीड आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा वसा कधीच टाकला नाही, बातमीची विश्वासहर्ता हीच आमची ताकद राहिलीय. किंबहुना त्याच्याच बळावर आम्ही प्रेक्षकांचा विश्वास आणि प्रेम मिळवलं आहे. तुम्ही आमच्यावर ठेवलेल्या याच विश्वासाबद्दल सर्व प्रेक्षकांचे शतशः आभार....

First published: April 6, 2018, 7:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading