मोठी बातमी, काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याने केली कोरोनावर मात, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

मोठी बातमी, काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्र्याने केली कोरोनावर मात, हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज

कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना नांदेडहुन पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं होतं.

  • Share this:

मुंबई, 04 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसचे नेते आणि कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, 14 दिवसांच्या उपचारानंतर कॅबिनेट मंत्री कोरोनातून मुक्त झाले आहे.

24 मे रोजी काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं होतं. त्यानंतर त्यांना मराठवाड्यातील मुळगावातून पुढील उपचारासाठी मुंबईत आणण्यात आलं होतं.

उत्तम वैद्यकीय उपचार मिळावे तसंच कोणतीही रिस्क असू नये, या मतप्रवाहामुळे संबंधित मंत्र्याला नांदेडवरून मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आलं होतं.  14 दिवसांच्या उपचारानंतर आज त्यांची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात आली. यात त्यांची चाचणी निगेटिव्ह आढळून आली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असला तरी त्यांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाइन राहावे लागणार आहे.

हेही वाचा-राजभवनाच्या दारावर ‘चक्रम’ वादळे, सेनेचा आशिष शेलारांना सणसणीत टोला

संबंधित मंत्री हे विधान परिषदेच्या निवडणूक कार्यक्रम दरम्यान मुंबईतील विधीमंडळामध्ये येथे सहभागी होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 9 सदस्यांचा शपथविधी कार्यक्रम विधिमंडळात पार पडला होता. या शपथविधी सोहळ्याला ते हजर होते. मुंबईतील दौरा आटोपून मराठवाड्यातील मुळगावी आल्यानंतर या मंत्र्यांनी स्वतः स्वतंत्र क्वारंटाइन करून घेतलं होतं. दरम्यान, या कालावधीमध्ये कोरोनाची टेस्ट करण्यात आली असता पॉझिटिव्ह आढळली होती. त्यामुळे त्यांना नांदेडवरून मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आलं होतं. याआधीही राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्र्याला कोरोनाची लागण झाली होती, उपचाराअंती त्यांनाही कोरोनावर मात केली होती.

संपादन - सचिन साळवे

First published: June 4, 2020, 2:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading