आदर्श प्रकरणात चव्हाणांचं नाव वगळण्याचा अर्ज करणे ही चूक होती,सीबीआयची कबुली

आदर्श प्रकरणात चव्हाणांचं नाव वगळण्याचा अर्ज करणे ही चूक होती,सीबीआयची कबुली

आपण हे सुप्रीम कोर्टातही मान्य केलं असल्याची माहिती आज सीबीआयच्या वतीनं मुंबई हायकोर्टाला देण्यात आली.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

27 सप्टेंबर : आदर्श सोसायटी प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव वगळण्याचा अर्ज सीबीआय कोर्टाकडे करणं ही आपली चूक होती असा कबुलीजबाब सीबीआयच्या वतीनं मुंबई हायकोर्टात देण्यात आला आहे. आपण हे सुप्रीम कोर्टातही मान्य केलं असल्याची माहिती आज सीबीआयच्या वतीनं मुंबई हायकोर्टाला देण्यात आली.

जानेवारी २०१४ ला सीबीआयने केलेला अर्ज विशेष सीबीआय कोर्टानं फेटाळून लावला आहे. अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चव्हाण यांच्याविरोधात खटला चालवण्यास दिलेल्या परवानगीला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं आहे. त्यावर प्रकरणाची सुनावणी सुरू असताना सीबीआयनं आपली चूक मान्य केली आहे.

या प्रकरणात आपल्याकडे अजून काही नवीन पुरावा हाती लागला असून तो सादर करण्यासाठी आपल्याला सरकारनं परवानगी दिली आहे असं सीबीआयनं सांगितलं आहे. पण हा पुरावा कधी सादर केला जाणार हे मात्र सीबीआयनं स्पष्ट केलं नाहीये. या प्रकरणाची सुनावणी उद्याही सुरू राहणार आहे.

First Published: Sep 27, 2017 06:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading