थर्टीफस्टच्या तोंडावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 3 कोटी किंमतीचे ड्रग्स जप्त

थर्टीफस्टच्या तोंडावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, 3 कोटी किंमतीचे ड्रग्स जप्त

एकाच आठवड्यात दुसरी मोठी कारवाई करून मुंबई पोलिसांनी ड्रग्स माफियाचं कंबरडं मोडलं आहे.

  • Share this:

दिवाकर सिंग,प्रतिनिधी

मुंबई, 31 डिसेंबर : नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र जल्लोषात तयारी सुरू असताना मुंबई पोलिसांनी तब्बल 3 कोटी 4 लाख 50 हजार किंमतीचे ड्रग्स पकडले आहे. एफेड्रीन नावाचे हे ड्रग्स असून 2 तस्करांनीही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जप्त करण्यात आलेले हे ड्रग्स हैदराबादहुन मुंबईत थर्टीफस्टच्या पार्टीसाठी आणले होते. मागील आठवड्यातच मुंबई पोलिसांनी तब्बल 1 हजार कोटींचे फेंटानिल ड्रग्सचा साठा जप्त केला होता.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे ड्रग्स माफियांनीही डोकंवर काढलं आहे. मागील आठवड्यात 28 डिसेंबरला वाकोला पोलिसांनी तब्बल 1 हजार कोटी किंमतीचा ड्रग्सचा साठा जप्त केला होता. एक आठवडा उलटत नाही, तेच आज पोलिसांनी कोट्यवधीचा ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. आंबोली पोलिसांनी कारवाई करत 3 कोटी 4 लाखाचा एफेड्रीनचा साठा जप्त केला आहे. हैदराबादहुन दोन तस्करांनी 20 किलो एफेड्रीनचा साठा आणला होता. पोलिसांनी या दोन्ही तस्करांना बेड्या ठोकल्या आहे.

अशी झाली कारवाई

रविवारी पहाटे 2 वाजता हे तस्कर एफेड्रीनचा साठा मुंबईत घेऊन येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना लगेच सूत्र फिरवत सापळा रचला आणि दोन्ही तस्करांना ड्रग्सच्या साठ्यासह जेरबंद केलं आहे.

"आरोपी मोहम्मद इस्माईल गुलाब हुसैन हा हैदाराबादचा राहणार आहे तर दुसरा आरोपी हा दयानंद मानिक पालघरचा राहणार आहे. दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे", अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज शर्मा यांनी दिली.

असा होणार होता एफेड्रीनचा वापर

मनोज शर्मा यांनी सांगितलं की, "थर्टीफस्टच्या पार्ट्यांमध्ये हे एफेड्रीन ड्रग्स वापरले जाणार होते. ड्रग्समध्ये वेगवेगळे प्रकार असता. काही ड्रग्स हे नाकातून घेतले जातात, तर काही ड्रग्स हे गोळ्यातून घेतात. एफेड्रीन हे असं ड्रग्स आहे जे बर्फात मिसळून घेत असतात. इतर ड्रग्सप्रमाणे एफेड्रीनही व्यक्तीच्या आरोग्याला घातक आहे."

============================================

First published: December 31, 2018, 6:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading