गौरव नारीशक्तीचा, न्यूज 18 लोकमतचा मुक्ता सन्मान सोहळा थाटामाटात संपन्न

गौरव नारीशक्तीचा, न्यूज 18 लोकमतचा मुक्ता सन्मान सोहळा थाटामाटात संपन्न

महाराष्ट्रातल्या 9 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणारा न्यूज18 लोकमतच्या मुक्ता सन्मान पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

  • Share this:

मुंबई, 27 मार्च :  महाराष्ट्रातल्या 9 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणारा न्यूज18 लोकमतच्या मुक्ता सन्मान पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरक स्मारक सभागृहात मुक्ता सन्मान सोहळा पार पडला. या सन्मान सोहळ्यात महाराष्ट्रातल्या 9 कर्तृत्ववान महिलांचा सन्मान झाला. शेती, प्रशासन, सेवा, अंधश्रद्धा निर्मूलन, विज्ञान चाकोरीबाहेरचं काम, सामाजिक संस्था, जन आंदोलन आणि जीवनगौरव या श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले गेले.

महाराष्ट्रभरातून आलेल्या 100 नामांकनांमधून तज्ञ परिक्षकांच्या निवड समितीनं पुरस्कारांसाठी मान्यवरांची निवड करण्यात आली होती. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी आणि भाग्यश्री लिमये यांच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण झालं.

या महिलांचा करण्यात आला सन्मान

1. ज्योती देशमुख, अकोला - विभाग - शेती

2. नंदिनी जाधव, पुणे - विभाग - रूढींविरोधत लढा

3. सूर्यप्रभा जैन, धुळे - विभाग - सेवा

4. रेखा मिश्रा, मुंबई - विभाग - प्रशासन

5. सविता रहांगडाले, आळेफाटा, ता.जुन्नर, विभाग - विज्ञान

6. डॉ. विनया जंगले, चिपळूण, विभाग - वेगळ्या वाटेवरचं काम

7. पारोमिता गोस्वामी, चंद्रपूर - विभाग - लढा-आंदोलन

8. कष्टकरी पंचायत, पुणे - संस्था

9. डॉ. स्मिता कोल्हे, मेळघाट, विभाग - जीवनगौरव

 

-----------------------------------------------------------------------------------------------------

काहीही जरी झालं तरी शाळा बंद पडू देणार नाही-सूर्यप्रभा जैन

-----------------------------------------------------------------------------------------------------

..म्हणून केलं मी हे सगळं-स्मिता कोल्हे

-----------------------------------------------------------------------------------------------------

माध्यमांच्या मदतीशिवाय गोरगरीबांना न्याय मिळूच शकत नाही-पारोमिता गोस्वामी

First published: March 27, 2018, 9:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading