मुंबई, 24 जुलै : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरली असल्यामुळे निर्बंध शिथील करण्यात आले आहे. पण, कोरोनाची भीती मात्र कायम आहे. याच भीतीपोटी मुंबईतील (mumbai) लोअर परेल (lower parel) परिसरातील एका उच्चशिक्षित नवविवाहीत दाम्पत्याने पुन्हा एकदा कोरोनाची लागण (corona symptoms ) झाली म्हणून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय कुमार (ajay kumar) आणि सुजा (suja) असं मृत दाम्पत्याचं नाव आहे. दोघेही आपल्या कुटुंबासह लोअर परेल परिसरातील भारत टेक्सटाईल मिल टॉवरमध्ये राहत होते. शुक्रवारी 23 जुलै रोजी दोघांचे मृतदेह आढळून आले होते. दोघांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती, त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
Most Handsome Asian Man: आशियातील सर्वात हँडसम पुरुष ठरला Prabhas
अजय कुमार आणि सुजा हे दोघेही केरळ येथील रहिवासी होते. 10 महिन्यांपूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. मुंबईत दोघेही कामाला होते. अजयकुमार एका खासगी कंपनीत कामाला होता. तर सुजाही एका बँकेत काम करत होती. लग्न झाल्यानंतर दोघे जण लोअर परेलमध्ये राहण्यासाठी आले होते. शुक्रवारी राहत्या घरात दोघांचे मृतदेह आढळून आले. अजयचा मृतदेह हा किचनमध्ये सापडला होता. तर पत्नी सुजाचा मृतदेह हा बाथरूममध्ये आढळून आला होता, असं वृत्त ई-टीव्ही भारतने दिले आहे.
दोघांचे मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांना तातडीने नायर रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी एक सुसाईट नोट सुद्धा आढळून आली होती.
न्यायासाठी लढणाऱ्यांसोबत धोका; पदवी नसतानाही वकिली करणाऱ्या महिलेचं फुटलं बिंग
अजय आणि सुजाला एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यातून दोघेही बरे झाले होते. पण, पुन्हा एकदा कोरोनाची लक्षण जाणवू लागली होती. त्यामुळे नैराश्यात जाऊन दोघांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. सुसाईड नोटमध्ये कोरोनामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर येणाऱ्या अहवालावर पुढील तपास पोलीस करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai