मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत नवविवाहितेला बसनं चिरडलं; भरपाई म्हणून पतीला मिळणार 55 लाख

मुंबईत नवविवाहितेला बसनं चिरडलं; भरपाई म्हणून पतीला मिळणार 55 लाख

सहा वर्षांपूर्वी एका नविवाहित सायंटिस्ट महिलेला मुंबईतील 'बेस्ट' बसनं धडक मारली होती. (File Photo)

सहा वर्षांपूर्वी एका नविवाहित सायंटिस्ट महिलेला मुंबईतील 'बेस्ट' बसनं धडक मारली होती. (File Photo)

सहा वर्षांपूर्वी एका नविवाहित सायंटिस्ट महिलेला (Newly Married Scientist Woman) मुंबईतील 'बेस्ट' बसनं धडक (BEST Bus Accident) मारली होती.

    मुंबई, 15 ऑगस्ट: सहा वर्षांपूर्वी एका नविवाहित सायंटिस्ट महिलेला (Newly Married Scientist Woman) मुंबईतील 'बेस्ट' बसनं धडक (BEST Bus Accident) मारली होती. या अपघातात संबंधित सायंटिस्ट महिलेसह तिच्या सहकारी मैत्रिणीचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला होता. भरधाव वेगानं बस चालवल्यामुळे हा अपघात घडला होता. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीनं न्यायालयात धाव घेतली होती. अपघाताच्या सहा वर्षानंतर मोटर अपघात दावा न्यायाधिकरणानं महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीला 55 लाख रुपये देण्याचा (Rs 55 lakh as compensation) आदेश न्यायाधिकरणानं दिला आहे. संबंधित अपघातात मृत्यू झालेल्या 26 वर्षीय नवविवाहित महिलेचं नाव संध्या कोठारी असून त्या टीसीएसमध्ये विजिलन्स सायंटिस्ट म्हणून कार्यरत होत्या. याठिकाणी त्यांना त्यावेळी 20 हजार रुपये मासिक वेतन होतं. अपघाताच्या दिवशी, 27 जून 2015 रोजी नवविवाहिता संध्या कोठारी आणि त्यांची  मैत्रीण टिना मोटवानी स्कूटरवरून खरेदीसाठी जात होत्या. यावेळी टीना या दुचाकी चालवत होत्या तर संध्या पाठीमागे बसल्या होत्या. हेही वाचा-Two Wheeler चालकांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडून या नियमांत बदल दरम्यान मुंबईतील बीकेसी भागातून जात असताना, बेस्ट बसनं भरधाव वेगात येत या दोघींना धडक मारली होती. या भीषण दुर्घटनेत संध्या आणि टीना दोघींनाही गंभीर दुखापत झाली होती. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असता, दोघींचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. संध्या कोठारी यांच्या मृत्यूनंतर पती पियूष कोठारी यांनी सप्टेंबर 2015  मोटर अपघात दावा न्यायाधिकरणात धाव घेतली होती. हेही वाचा-युवासेना जिल्हा प्रमुखावर प्राणघातक हल्ला; पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीच रचला कट? या प्रकरणी सुनावणी करताना मोटर अपघात दावा न्यायाधिकरणानं सहा वर्षानंतर आपला महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. विविध बाबी लक्षात घेत, न्यायाधिकरणानं मृत महिलेच्या पतीला बेस्टने 55 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश दिले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Accident, Mumbai

    पुढील बातम्या