Home /News /mumbai /

नवी मुंबईतील DIG विनयभंग प्रकरणाला नवं वळण, उद्धव ठाकरेंच्या नावाने धमकावलं

नवी मुंबईतील DIG विनयभंग प्रकरणाला नवं वळण, उद्धव ठाकरेंच्या नावाने धमकावलं

दोन दिवसापूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडलेली नाही.

    विनय म्हात्रे, नवी मुंबई, 9 जानेवारी : नवी मुंबईत डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलं आहे. दोन दिवसापूर्वी घरात चिठ्ठी लिहून बेपत्ता झालेली पीडित मुलगी अजून सापडली नाही. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे ड्रायव्हर असलेल्या दिनकर साळवे याच्याकडून गायब असलेल्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांना पनवेल कोर्टातच धमकवण्यात आल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. पालकांच्या या दाव्यामुळे आता नवी खळबळ उडाली आहे. पनवेल कोर्टात परवा दुपारी निशिकांत मोरे यांच्या जामिनाची सुनावणी असताना मुलीच्या वडिलांच्या जवळ जात ' शांत रहेनेका, मै उध्दव ठाकरे का ड्रायव्हर हू' अशी दिनकर साळवे यांच्याकडून धमकी देण्यात आल्याचा दावा पीडित मुलीच्या पालकांकडून करण्यात आला आहे. त्यानंतर पीडित मुलींच्या कुटुबीयांनी धमकी दिल्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. निर्भया बलात्कार प्रकरण: नराधमाकडून सुप्रीम कोर्टात पहिली क्युरेटिव्ह याचिका कॉन्स्टेबल असलेले दिनकर साळवे गेल्या 15 दिवसापासून उध्दव ठाकरे यांच्या गाडीवर ड्रायव्हर आहेत. दिनकर साळवे आणि निशिकांत मोरे यांची मागील 15 वर्षांपासून ओळख आहे. नवी मुंबई पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे बेपत्ता पीडित मुलीचा शोधही सुरू आहे. पीडित मुलीने लिहिली सुसाईड नोट खारघरमध्ये वास्तव्यास असलेले आणि पुणे येथे मोटर ट्रान्सपोर्ट विभागात कार्यरत असलेले पोलीस उप महानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेली अल्पवयीन मुलगी सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. तळोजा येथील घरातून सर्व झोपल्यानंतर रात्री 11-12च्या दरम्यान ती निघून गेली. जाताना तिने घरात सुसाईड नोट लिहिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जालना पोलिसांचा AIR STRIKE, हातभट्टीचे अड्डे केले उद्ध्वस्त 'मी आत्महत्या करीत असून शोधण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या आत्महत्येस विनयभंग करणारा DIG निशिंकात मोरे जबाबदार आहे,' असं सुसाईड नोटमध्ये लिहिण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये तळोजा पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली असून मुलीचा अद्याप पत्ता लागलेला नाही. एका व्हिडीओवरून निशिकांत मोरेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाढदिवस साजरा करताना विनयभंग केल्याचं अप्लवयीन तरुणीने तक्रारीत म्हटलं होतं. नवी मुंबईत 5 जून रोजीचा हा प्रकार झाला होता. पण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने मुलीचे कुटुंब तणावात होते. अखेर 26 जुलै रोजी तळोजा पोलीस ठाण्यात मोरेविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला गेला.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Navi mumbai, Navi mumbai crime, Uddhav thackeray

    पुढील बातम्या