Home /News /mumbai /

कोरोना रुग्णांमध्ये राज्यात दिसली नवी लक्षणं, ‘दुखणं अंगावर काढू नका’!

कोरोना रुग्णांमध्ये राज्यात दिसली नवी लक्षणं, ‘दुखणं अंगावर काढू नका’!

शुक्रवारी दिवसभरात 1,145 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 2,56,507 एवढी झाली आहे.

शुक्रवारी दिवसभरात 1,145 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ही 2,56,507 एवढी झाली आहे.

'मुंबईसह राज्यातल्या 7 जिलह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू दर आहे. मृत्यू दर कमी व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.'

मुंबई 18 ऑगस्ट: राज्यात कोरोनारुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे चिंता वाढली आहे. तर कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाणही वाढत आहे. जे रुग्ण कोरोनामुक्त झाले त्यांच्यात आता नवं लक्षण दिसत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. थकवा येणं, श्वास घ्यायला त्रास होणं ही नवी लक्षणे आढळून येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही. मात्र दुखणं अंगावर काढू नका असा सल्लाही राजेश टोपे यांनी दिला. ते म्हणाले, जे दुरुस्त झाले आहेत त्याना पुन्हा श्वसनाचा त्रास जाणवतो आहे ही बाब निदर्शनास येत आहे. कोरोनाच आणखी एक लक्षण दिसू लागलं आहे. पुण्यात रुग्ण दुपट होण्याचा रेट राज्यात सर्वात चांगला , पुण्यात 42 दिवसांत रुग्ण दुपट होतात, तोच दर राज्यात 30 दिवसाचा आहे. काही औषधं जर परिणामकारक नसेल तर याबाबतचा अंतिम निर्णय टास्कफोर्स ने घ्यावा असं मतही त्यांनी व्यक्त केलं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याच्या निवासस्थान असलेल्या भागातील 200 च्या आसपास लोकांची तपासणी करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोनाविरोधात लढणाऱ्या साताऱ्यातील 'या' टीमचं सर्वत्र होतंय कौतुक राज्यातल्या 7 जिलह्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू दर असल्याचंही त्यांनी सांगितलं.  त्यात मुंबई 5.54 टक्के, नंदुरबार 4.48, लातूर, जळगाव 3.78,  रत्नागिरी 3.59, सोलापूर 4.35, अकोला 4.25 टक्के असा दर आहे. आरोग्य विभागात भरतीची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल असंही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटात या 5 क्षेत्रात आहेत नोकरीच्या संधी, करू शकता प्रयत्न जिम बाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. जिम सुरू करायला हरकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.  धार्मिक स्थळांबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतील. मोठे धार्मिक स्थळ उघडले तर करोना चा प्रादुर्भाव वाढेल असं वाटत असंही ते म्हणाले.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या