Home /News /mumbai /

Maharashtra Lockdown : लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर, काय राहणार सुरू, काय बंद?

Maharashtra Lockdown : लॉकडाऊनची नवीन नियमावली जाहीर, काय राहणार सुरू, काय बंद?

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत आदेश दिले आहे.

महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत.

  मुंबई, 20 एप्रिल: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे राज्य सरकारकडून (Maharashtra Government) कडून लॉकडाऊनचे (Maharashtra Lockdown) नियम आता आणखी कडक करण्यात आले आहे.  नवीन आदेशानुसार आता किराणा मालाची दुकानं, डेअरी, मच्छी मार्केट सकाळी 7 ते 11 याच वेळेत सुरू राहणार आहे. कोविड-19 चा प्रसार थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काही निर्बंध व मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत, जे 1 मे 2021 च्या सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. परंतु, महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता सदर निर्बंधांमध्ये काही फेरबद्दल केले आहेत.  हे बदल 20 एप्रिल संध्याकाळी 8 वाजेपासून 1 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत अस्तित्वात राहील.

  अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, 100 कोटी वसुली प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता

  सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी आणि मिठाई दुकाने, सर्व खाद्यपदार्थांचे दुकान (चिकन, मटण, कोंबडी, मासे, अंडी सह) त्याचप्रमाणे कृषी अवजारे व कृषी उत्पादने, पाळीव प्राण्यांचे खाद्याची दुकाने, पावसाच्या हंगामासाठी साहित्य (वैयक्तीक व संघटनात्मक) सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत उघडे राहतील. वरील नमूद दुकानांमधून घरपोच सेवा देण्यासाठी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 पर्यंत मुभा असेल, परंतु आवश्यक वाटल्यास स्थानिक प्रशासन या वेळांमध्ये फेरबदल करू शकते. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाला वाटल्यास कलम दोन अंतर्गत काही गोष्टींना व सेवांना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संमती घेऊन आवश्यक सेवा म्हणून घोषित करू शकते. अशी आहे नवीन नियमावली  (यावेळेत फक्त ही दुकाने सुरू राहणार आहेत) १) किराणा दुकाने- सकाळी 7 ते 11 २) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री- सकाळी 7 ते 11 ३) भाजीपाला विक्री- सकाळी 7 ते 11 4) फळे विक्री- सकाळी 7 ते 11 5)अंडी,मटण, चिकन,मासे विक्री- सकाळी 7 ते 11 6) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने- सकाळी 7 ते 11 7) पशूखाद्य विक्री- सकाळी 7 ते 11 8)बेकरी, मिठाई दुकाने, सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने -सकाळी 7 ते 11 9)पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने- सकाळी 7 ते 11 10)येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने- सकाळी 7 ते 11 मात्र, या सर्व दुकानांतून सकाळी 7 ते रात्री 8 वा.पर्यंत कोविड नियमांचे पालन करून घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:sachin Salve
  First published:

  पुढील बातम्या