आमदारांच्या निवासासाठी उभारणार नवीन ‘मनोरा’,उद्या भूमिपूजन

आमदारांच्या निवासासाठी उभारणार नवीन ‘मनोरा’,उद्या भूमिपूजन

सध्या आमदारांसाठी असलेलं मनोरा हे निवासस्थान धोकादायक असल्यानं नवीन मनोरा आमदार निवास बांधण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई 1 जुलै :  राज्यातील आमदारांच्या नवीन निवासस्थानासाठी आता अत्याधुनिक इमारत उभी राहणार आहे. सध्याचा ‘मनोरा’ हा टॉवर पाडण्यात येणार असून त्याच ठिकाणी नवी इमारत उभारण्यात येणार आहे. या कामाचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी 2 जूनला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, विधानसभा आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते उपस्थित राहणार आहेत. उद्या सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

सध्या आमदारांसाठी असलेलं मनोरा हे निवासस्थान धोकादायक असल्यानं नवीन मनोरा आमदार निवास बांधण्यात येणार आहे. छत गळणे, छताचे प्लॅटर निघणे असे अनेक प्रकार घडत असल्याने हे निवासस्थान राहण्यायोग्य राहिले नव्हते त्यामुळे सरकारने हा निर्णय घेतलाय. नवीन निवासस्थानं हे अत्याधुनिक आणि सगळ्या सोई सुविधांचा विचार करून बनविण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागच हा टॉवर उभारणार आहे.

ठाणे स्टेशनवरच्या जीवघेण्या गर्दीचा VIDEO व्हायरल

मराठा आरक्षणाचं नवं विधेयक मंजूर

मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने योग्य ठरवला मात्र त्याचं टक्का थोडा कमी केला. या निर्णयामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला. सरकारच्या या आधीच्या मराठा आरक्षण विधेयकात सरसकट 16 टक्के एवढं आरक्षण देण्यात आलं होतं. कोर्टाच्या निर्णयामुळे त्यात बदल करावा लागणार होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणाचं नवं विधेयक सभागृहात मांडलं. यात 12 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलीय. विधानसभेत एकमताने हे विधेयक मंजूर करण्यात आलं.

SPECIAL REPORT : मुंबईची तुंबई झालीच नाही, ऐका महापौर काय म्हणताहेत...

मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला आहे. आरक्षण देण्याचा निर्णय कोर्टाने मान्य केलाय पण टक्केवारीत बदल सांगितलाय. त्या संदर्भात आता मराठा आरक्षण शैक्षणिक 12 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 13 टक्के असं करणारं नवं विधेयक मांडण्यात येत आहे. त्यानंतर SEBC मराठा आरक्षण विधेयक एकमतानं  मंजूर झालंय. विधानसभेनंतर विधान परिषदेतही नवं विधेयक मांडण्यात आलं आणि सभागृहाने एकमताने त्याला मंजूरी दिली.

First published: July 1, 2019, 8:19 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading