मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम;एकाच धावपट्टीवरून 980 विमानांचं टेक-ऑफ आणि लँडिंग

मुंबईसाठी एक अभिमानाची बातमी आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं आपलाच विक्रम मोडलाय.

  • Share this:

05 फेब्रुवारी : मुंबईसाठी एक अभिमानाची बातमी आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानं आपलाच विक्रम मोडलाय. एकाच दिवसात एकाच धावपट्टीवरून तब्बल 980 विमानांच टेक-ऑफ आणि लँडिंग झाल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. 20 जानेवारीला हा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे. या सगळ्या विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग सुखरूप आणि वेळेत झाल्यानं या विक्रमाची यशस्वी नोंद झाली आहे.

याआधी 6 डिसेंबरला 974 विमानांचं टेक ऑफ आणि लँडींग झालं होतं. मुंबईतले विमानतळ हे जगातल्या सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे. वाहतूकीसाठी एकच धावपट्टी असल्यानं वाहतूकीचं नियोजन हे अतिशय आव्हानात्मक असतं. पण अधिकाऱ्यांनी मोठ्या कौशल्यानं परिस्थिती हाताळात हे अवघड काम पार पाडालं.

यावेळी सरासरी दीड मिनिटीला एका विमानाने टेक ऑफ आणि लँडींग केलं होतं. एकच धावपट्टी असलेला ब्रिटनमधला गॅट्विक विमानतळ हा जगातला दुसरा व्यस्त विमानतळ आहे. मात्र या विमानतळालाही ही कामगिरी शक्य झाली नाही ती आपल्या मुंबई विमानतळानं यशस्वीरीत्या करून दाखवली आहे.

पण दरम्यान मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची मुख्य धावपट्टी दुरुस्तीच्या कामासाठी १७ फेब्रुवारी पर्यंत बंद असणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असे सात तास ही धावपट्टी बंद असेल. त्यामुळं मुंबई विमातळावर ये-जा करणारी विमानं पर्यायी धावपट्टीवर वळवण्यात येतील.

मुंबई विमानतळाचा विश्वविक्रम

- 20 जानेवारी - 24 तासांत 980 टेक-ऑफ आणि लँडिंग

- एकच रनवे असणाऱ्या विमानतळांमध्ये मुंबईचा क्रमांक पहिला

- मुंबईत रनवे 2, पण एका वेळी एकच रनवे वापरता येतो

- 6 डिसेंबर 2017 - 974 टेक-ऑफ आणि लँडिंग

- 24 नोव्हेंबर 2017 - 969 टेक-ऑफ आणि लँडिंग

- दररोज सरासरी 930 टेक-ऑफ आणि लँडिंग

- वर्षाला 4.52 कोटी प्रवासी

First published: February 5, 2018, 9:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading