• होम
  • व्हिडिओ
  • प्रत्येक पालकानं पाहावा हा VIDEO, शाळेतली मुलं-मुलीही करतायत रेल्वे स्टंट
  • प्रत्येक पालकानं पाहावा हा VIDEO, शाळेतली मुलं-मुलीही करतायत रेल्वे स्टंट

    News18 Lokmat | Published On: Oct 23, 2018 12:39 PM IST | Updated On: Oct 23, 2018 12:44 PM IST

    मुंबईच्या लोकलमधले अनेक स्टंट तुम्ही पाहिले असतील. पण आताचा हा स्टंट व्हिडिओ तुम्हाला थक्क करेल. रेल्वेत स्टंट करणाऱ्या या माकडांचा आणखी एक जीवघेणा स्टंटसमोर आला आहे. सगळ्यात धक्कादायक म्हणजे शाळेच्या गणवेशात असलेले हे विद्यार्थी घरी जाताना हे स्टंट करत आहे. हा व्हिडिओ हार्बर लाईनवरील रेल्वे स्थानकावरचा आहे. हा व्हिडिओ जरा नीट पाहिला की लक्षात येतं की यात फक्त मुलंच नाही तर मुलीदेखील स्टंट करत आहेत. हा व्हिडिओ दाखवून तुम्हाला प्रोस्ताहित करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. पण प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. असे रेल्वे स्टंट कधी आपला जीव घेतली याचा काही नेम नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading