S M L

परळ स्थानकावरचा नवीन प्लॅटफॉर्म सुरू होणार जुलैमध्ये!

जुन्या प्लॅटफॉर्मला जोडून असणाऱ्या नवीन प्लॅटफॉर्मवर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलना थांबा दिला जाणार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 14, 2018 02:01 PM IST

परळ स्थानकावरचा नवीन प्लॅटफॉर्म सुरू होणार जुलैमध्ये!

मुंबई, 14 मे : मध्य रेल्वेवरील परळ स्थानकातील प्रचंड गर्दीचा ताण कमी करण्यासाठी जुलैपासून नवीन प्लॅटफॉर्म सेवेत येणार आहे. जुन्या प्लॅटफॉर्मला जोडून असणाऱ्या नवीन प्लॅटफॉर्मवर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकलना थांबा दिला जाणार आहे. विशेष म्हणजे जुन्या आणि नव्या अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरून सुटणाऱ्या लोकलमध्ये चढ-उतार करणे शक्य होणार आहे. हा नवीन प्लॅटफॉर्म १५ डब्यांच्या लोकल थांबण्याच्या दृष्टीने बांधण्यात आला आहे.

परळ स्थानकाचा विस्तार

- नवा प्लॅटफॉर्म जुलैमध्ये सुरू होणार

- कल्याणच्या दिशेनं जाताना दोन्ही बाजूला उतरता येणार

- प्लॅटफॉर्म क्र. 2 आता क्रं. 3 होणार

Loading...

- सीएसटीकडे जाणारी स्लो लोकल प्लॅटफॉर्म क्र. 3 वरून सुटणार

- प्लॅटफॉर्म क्र. 2 वरून परळ लोकल सुटणार

- परळ लोकल स्लोच असणार, फास्टचा पर्याय नाही

- प्लॅटफॉर्मची रुंदी 1.50 मीटरनं वाढवणार

- एकूण खर्च - 51 कोटी रु.

- दादर स्थानकावरचा ताण कमी करण्यावर भर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 14, 2018 02:01 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close