Home /News /mumbai /

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेसकडून नवीन नावं समोर, काही जणांना मिळणार डच्चू?

राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेसकडून नवीन नावं समोर, काही जणांना मिळणार डच्चू?

राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी काँग्रेसची बुधवारी रात्री उशिरापर्यंत खलबत्त सुरू होती.

    मुंबई, 29 ऑक्टोबर : राज्यपाल नियुक्त सदस्यांची (Governor-appointed MLA) यादीत कुणा-कुणाची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाकडून जवळपास नाव निश्चित झाली आहे. मात्र, काँग्रेसकडून (Congress) ऐनवेळी काही नाव बदलण्याची शक्यता आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार,  राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी काँग्रेसची बुधवारी रात्री उशिरापर्यंत खलबतं सुरू होती. काँग्रेसकडून 3 जणांची नाव पाठवण्यात येणार आहे. यात  उर्मिला मातोंडकर, सत्यजित तांबे आणि नसीम खान खान यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. धक्कादायक! अंघोळीसाठी नदीत उतरले अन् घात झाला...6 युवकांचा बुडून मृत्यू परंतु, आता उर्मिला मातोंडकर यांच्या जागी नगमा यांच्या नावाबद्दल चर्चा झाल्याचे कळत आहे. त्याचबरोबर माणिक जगताप, रजनी पाटील, मुझप्फर हुसैन यांच्या नावावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच चंद्रपूर येथील अनिरूद्ध वनकर  यांना काँग्रेस पक्षाकडून राज्यपाल नियुक्त जागेत संधी मिळेल असं बोललं जात आहे. आज दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसला आपली यादी सादर करायची आहे. त्यामुळे काँग्रेसकडून कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहण्याचे ठरणार आहे. IPL 2020 : RCBच्या पराभवासाठी विराट जबाबदार?वाचा का टेकावे लागले मुंबईसमोर गुडघे दरम्यान, भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेसाठी संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तसंच सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे देखील राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदार होतील, अशी चिन्ह आहेत. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सर्वात जवळचे सहकारी मानले जाणारे मिलिंद नार्वेकर हेदेखील विधीमंडळात दिसू शकतात. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या यादीत शिवसेनेकडून त्यांचं नाव दिलं जाण्याची शक्यता आहे. वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यासाठी माघार घेणाऱ्या माजी आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनाही शिवसेनेकडून संधी दिली जाऊ शकते, असं बोललं जात आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची संभाव्य यादी - राष्ट्रवादी एकनाथ खडसे राजू शेट्टी आदिती नलावडे आनंद शिंदे - शिवसेना आदेश बांदेकर मिलिंद नार्वेकर सुनील शिंदे सचिम अहिर - काँग्रेस उर्मिला मातोंडकर सत्यजित तांबे नसीम खान सचिन सावंत/राजू वाघमारे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Congress

    पुढील बातम्या