मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धक्का; एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं

मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धक्का; एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं

एकनाथ शिंदे गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. आज संध्याकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे.

  • Published by:  Kiran Pharate
मुंबई 25 जून : एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केलं आहे. शिवसेनेचे 38 आणि अपक्ष असे 50 आमदार आमच्यासोबत आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. अशात एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत. यादरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे गटाचं नाव (Eknath Shinde Party Name) आता ठरलेलं आहे. एकनाथ शिंदे इम्पॅक्ट, ट्वीट केल्यानंतर अवघ्या तासाभरात दिलीप वळसे पाटलांनी दिले आदेश एकनाथ शिंदे गटाला शिवसेना बाळासाहेब ठाकरे नाव देण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. आज संध्याकाळी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं समोर येत आहे.आता या नावाला शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीत शिवसेना आमदारांसोबत नेमकं काय घडलं? खदखद अखेर बाहेर, एकनाथ शिंदेंनी शेअर केला VIDEO कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलताना म्हटलं होतं की त्यांनी ठाकरे आणि शिवसेना हे नाव न घेता जगून दाखवावं. अशात आता आज शिंदे गटाचं नवं नाव समोर आलं असून यात ठाकरे आणि शिवसेना दोन्ही नावं घेतली गेली आहेत. अशात आता शिवसेना याला विरोध करणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान शिवसेनेच्या आमदारांनी आणि नेत्यांनी शिंदे गटाला बाळासाहेबांचं नाव वापरण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. हे नाव स्वार्थासाठी घेतलेलं असून हे सगळं बंडखोरांना बाळासाहेबांना मिळवून दिलं तरीही अशाप्रकारे गद्दारी करणाऱ्यांना हा अधिकारी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Eknath Shinde

पुढील बातम्या