पश्चिम आणि मध्य रेल्वेवर लोकलच्या 60 नव्या फेऱ्या; विरार-डहाणू रोड मार्गावर मात्र निराशा

पश्चिम आणि मध्य रेल्वेवर लोकलच्या 60 नव्या फेऱ्या; विरार-डहाणू रोड मार्गावर मात्र निराशा

पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून 32 आणि 14 जादा लोकल फेऱ्या सुरू झाल्या आहेत. तर ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर 14 जादा फेऱ्या उद्यापासून सुरू करण्यात येणार आहेत.

  • Share this:

मुंबई,1 ऑक्टोबर: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून 32  आणि 14 जादा लोकल फेऱ्या सुरू झाल्या आहेत. तर  ठाणे ते वाशी, पनवेल मार्गावर 14 जादा फेऱ्या उद्यापासून सुरू करण्यात येणार आहेत.

या वाढीव फेऱ्यांमुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक प्रवाशांचे प्रश्न सुटणार आहे. पश्चिम रेल्वेवर 32 फेऱ्या वाढवण्यात आल्या असल्या तरी पण दुसरीकडे मात्र विरार पुढे डहाणूरोड दरम्यान एकही वाढीव फेरी देण्यात आलेली नाही. त्यामुळं या भागात नाराजी व्यक्त करण्यात येते आहे.

सुमारे एक लाखाहुन अधिक प्रवासी विरार- डहाणू रोड या मार्गावर प्रवास करतात. पण या पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय क्षेत्राला मात्र एकही वाढीव  फेरी देण्यात आली नाही. विशेष म्हणजे 16 एप्रिल 2013 मध्ये पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा ही विरार पुढे डहाणू रोड पर्यंत विस्तारित करण्यात आली. त्या नंतर लोकल सेवेत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. या उलट वैतारण- डहाणू पट्ट्यातील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात येतो आहे. वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई होत असताना पालघर जिल्ह्यातील प्रवासी अाशेवर  राहिले आहेत.

मुंबईतील उपनगरीय लोकल मार्गावरील प्रवाशांना या वाढीव फेऱ्यांमुळे दिलासा मिळणार आहे. विरार- डहाणू रोड दरम्यान च्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेने ठेंगा दाखवला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2017 12:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading