महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नवं सरकार, दिग्गज भाजप नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नवं सरकार, दिग्गज भाजप नेत्याच्या दाव्यामुळे खळबळ

मतभेदांमुळे हे सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही.

  • Share this:

मुंबई 05 जानेवारी : तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारचं रखडलेलं खातेवाटप जाहीर झालं. मात्र अनेक नेत्यांची नाराजी अजुन गेलेली नाही. आपल्या मनासारखं खातं मिळालं नसल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. त्यातच अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याच्या बातमीमुळेही आघाडी सरकारच्या गोटात खळबळ उडाली होती. याचा फायदा घेत भाजपने सरकारवर हल्लाबोल करायला सुरुवात केलीय. या मतभेदांना चव्हाट्यावर आणून सरकारविरोधात जनमत संघटीत करण्याचं काम भाजपचे नेते करत आहेत. आघाडी सरकार तयार होण्याच्या आधीपासूनच मतभेदांची मालिकाच सुरू झालीय. त्यामुळे एक झाला की दुसरा प्रश्न उभा राहतोय. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय घेताना चर्चेत प्रचंड वेळ जातोय. आदेश देऊन काम करायची सवय असलेल्या उद्धव ठाकरेंना याची सवय आता करून घ्यावी लागणार असं राजकीय वर्तुळात बोललं जातय. त्यातच भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय.

मुनगंटीवार म्हणाले, मतभेदांमुळे हे सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही. गुढी पाडवा हे मराठी नव वर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल असा दावा त्यांनी केलाय. त्यांच्या या दाव्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

'मातोश्री'बाहेरील शेतकऱ्याला भेट नाकारल्यानंतर बच्चू कडू यांचा सरकारला घरचा अहेर

सत्तार मातोश्रीवर, मनधरणी झाली 

कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. राजीनामा नाट्यानंतर अब्दुल सत्तार यांनी मौन सोडले. ते म्हणाले, 'मी नाराज नाही. मला दिलेल्या खात्यांवर मी समाधानी आहे. मी राजीनामा दिला नाही, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. माझं साहेबांशी बोलणं झालं आहे. मी उद्या (सोमवार) सायंकाळी पाच वाजता पुन्हा मातोश्रीवर येणार असून त्यानंतर सविस्तर बोलेल असे सत्तार यांनी पत्रकारांना सांगितले.

काँग्रेसचं सत्ताकेंद्र बाळासाहेब थोरातच, चव्हाणांना मागे टाकत ठरले नंबर एक'

आणखी काय म्हणाले अब्दुल सत्तार?

जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे कुणीही फुठलं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची माणसं फुटली, असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. काही बाबी या पक्षाअंतर्गत असतात. त्यावर मुख्यमंत्री बोलतील. इतर नेत्यांशीही मुख्यमंत्री चर्चा करतील, असेही राज्यमंत्री सत्तार यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2020 06:41 PM IST

ताज्या बातम्या