Home /News /mumbai /

नव्या कोरोना विषाणूबद्दल मोठी बातमी, युकेतून मुंबईत आली 3 विमानं पण...

नव्या कोरोना विषाणूबद्दल मोठी बातमी, युकेतून मुंबईत आली 3 विमानं पण...

या 3 विमानांमध्ये 600 प्रवासी आले असून सर्व प्रवाशांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. या प्रवाशांची 5 दिवसांनंतर पुन्हा आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे

    मुंबई, 22 डिसेंबर : कोरोनाची लाट आटोक्यात आल्यानंतर ब्रिटेननमध्ये कोरोनाचा नवा प्रकार (New strain of virus in UK) आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकारनेही तातडीने विमान सेवा बंद केली आहे. अशातच युकेवरून मुंबईत आलेल्या प्रवाशांबद्दल दिलासादायक वृत्त हाती आले आहे. युकेवरून आलेल्या प्रवाशांमध्ये एकालाही कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न झाले आहे. सोमवारी मुंबईत (mumbai airport) रात्री आणि आज दिवसभरात मिळून 5 फ्लाईट येणार होत्या. त्यापैकी 1 विमान रद्द झाले आहे. त्यांपैकी 3 विमाने आली आहेत. अजून एक विमान हे आज रात्री येणार आहे. सोमवारी रात्रीपासून युकेहून आलेल्या प्रवाशांपैकी एकही पॉझिटिव्ह व्यक्ती सापडलेली नाही, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, परीक्षा अर्ज भरण्याचे वेळापत्रक तसंच,  या 3 विमानांमध्ये 600 प्रवासी आले असून सर्व प्रवाशांना  क्वारंटाइन करण्यात आले आहे. या प्रवाशांची 5 दिवसांनंतर पुन्हा आरटीपीसीआर  टेस्ट करण्यात येणार आहे. पण, सध्या आलेल्या प्रवाशांपैकी कुणीही पॉझिटिव्ह नाही, असंही ककाणी यांनी सांगितले आहे. 'युकेतून आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथून  विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच बोर्ड करण्याची परवानगी दिली आहे. युकेहून येणारी विमान सेवा आज रात्रीपासून बंद होणार आहेत. शेवटची एकच फ्लाईट रात्री 11 वाजता येण्याची बाकी आहे. मिडल इस्ट आणि वेस्ट युरोप मधून येणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाइन केले जात आहे, असंही त्यांनी सांगितले. आंबोली-दोडामार्गाच्या जंगलात आढळले दुर्मिळ 'वनमानव', PHOTO आला समोर युकेहून ब्रेक जर्नीसाठी देशांतर्गत प्रवास करुन जे असतील त्यांच्यासाठी त्या त्या राज्यांमधील नियम लागू होतील. दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथून  विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच बोर्ड करण्याची परवानगी असणार आहे. रिपोर्ट नसल्यास विमानतळावरच टेस्ट केली जाणार आहे, असंही ककाणी यांनी सांगितले. ब्रिटेनमधून येणाऱ्या विमानांव्यतिरीक्त  इतर युरोप आणि मिडल ईस्ट मधूनही जे प्रवासी येत आहे त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. या प्रवाशांना सेव्हन हिल्स आणि जिटी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या