• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • नवी मुंबईनंतर आता मुंबईतही रंगला नामकरणाचा नवा वाद, भाजपचा 'टिपू सुलतान' नावाला विरोध

नवी मुंबईनंतर आता मुंबईतही रंगला नामकरणाचा नवा वाद, भाजपचा 'टिपू सुलतान' नावाला विरोध

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बैठका ॲानलाईन घेतल्या जात आहेत. त्यात या वादाची भर पडल्याने अध्यक्षांनी सभा बरखास्त केली.

  • Share this:
मुंबई, 15 जुलै : नवी मुंबई विमानतळाला (navi mumbai airport name controversy) नामकरणाचा वाद ताजा असताना आता मुंबईत नवीन वाद सुरू झाला आहे. यावेळी वादाचे कारण ठरले आहे ते टीपू सुलतान (Tipu Sultan) यांचे नाव. गोवंडी (govandi) परिसरातील समाजवादी पक्षाच्या (samajwadi party) नगरसेविका रुक्साना सिद्दीकी (rukhsana siddiqui corporator) यांनी त्यांच्या भागात नव्याने तयार करण्यात येणाऱ्या बागेला टिपू सुलतानचे नाव द्यावे असा प्रस्ताव जानेवारीमध्ये दिला होता. आता हा प्रस्ताव बाजार उद्यान समितीमध्ये आला असता भाजपने त्याला जोरदार विरोध केला. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व बैठका ॲानलाईन घेतल्या जात आहेत. त्यात या वादाची भर पडल्याने अध्यक्षांनी सभा बरखास्त केली. या गोंधळात हा प्रस्ताव आयुक्तांकडे फेर विचारार्थ पाठवण्यात आला आहे. भाजप नगरसेविका स्वप्ना म्हात्रे यांनी या प्रस्तावाला विरोध करताना हिंदवी स्वराज्याची स्थापना ज्यांनी केली त्या शिवरायांच्या भूमीत हिंदूंवर अन्याय करणाऱ्या जुलमी शासकाचे नाव आम्ही देवू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

कोरोना काळातही 'तिनं' जिद्दीनं व्यवसाय केला उभा; जिद्दीच्या जोरावर गाठलं शिखर

तर विनोद यादव या भाजप नगरसेवकाने मुंबई महापालिकेने चुकीचा पायंडा पाडू नये, असं आवाहन केलं आहे. यावर शिवसेनेनं सावध भूमिका घेतली असून जे कायद्यात असेल ते करू, असं म्हटलं आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्येक नगरसेवकाला त्याच्या वॅार्डमध्ये असे नाव प्रस्तावित करण्याचा अधिकार आहे, असे म्हणून समाजवादी पक्षाला एका प्रकारे समर्थन देण्याचा प्रयत्न केला आहे. पण नियमानुसार, एखाद्या बागेला आधीच हे नाव दिले असेल तर ते पुन्हा देता येत नाही. मालवणी इथं एका उद्यानाला आधीच हे नाव दिले असल्याची माहिती आहे.

राज्यासाठी दिलासादायक बातमी, अर्धा महाराष्ट्र कोरोनातून लवकरच मुक्त पण...,

त्यामुळे हा प्रस्ताव नाकारला जाऊ शकतो आणि शिवसेनाचा सुंठे वाचून खोकला गेला, असे होऊ शकते. मुंबई महापालिकेची निवडणूक अवधी काही महिन्यांवर असताना या नामांतराच्या मुद्याचा कोणत्या पक्षाला काय फायदा होतो हे काही महिन्यातच कळेल. पण तूर्तास तरी राजकीय वातावरण निर्मितीला पोषक झाला आहे.
Published by:sachin Salve
First published: