मोदींचे 'असत्याचे' प्रयोग; व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी साधला निशाणा

मोदींचे 'असत्याचे' प्रयोग; व्यंगचित्रातून राज ठाकरेंनी साधला निशाणा

त्यात गांधीजींच्या हातात 'सत्याचे प्रयोग' हे त्यांचं आत्मचरित्र दिसतं आहे. तर मोदींच्या हातातली पुस्तकावर इंग्रजीत माझे असत्याचे प्रयोग असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे मोदींच्या पायाशी सही न करता राज ठाकरेंनी चित्रात सही गांधीजींच्या पायाशी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑक्टोबर: आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. त्यांच्या जयंतीचं निमित्त साधून आज राज ठाकरे यांनी एक व्यंगचित्र त्याच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केलं आहे. या व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींवर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

या व्यंगचित्रात महात्मा गांधी आणि नरेंद्र मोदी दोघंही दिसतं आहेत. चित्रात वर एका कोपऱ्यात एकाच मातीचे सुपुत्र असं इंग्रजीत लिहिलं आहे. त्यात गांधीजींच्या हातात 'सत्याचे प्रयोग' हे त्यांचं आत्मचरित्र दिसतं आहे. तर मोदींच्या हातातली पुस्तकावर इंग्रजीत माझे असत्याचे प्रयोग असं लिहिलं आहे. विशेष म्हणजे मोदींच्या पायाशी सही न करता राज ठाकरेंनी चित्रात सही गांधीजींच्या पायाशी केली आहे.

'इतकं धादांत खोटं बोलणारं सरकार आणि इतकं खोटं बोलणारे पंतप्रधान मी कधीच पाहिले नाहीत', अशी चपराक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी लगावली होती. त्यानंतर, आज गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या व्यंगचित्रातून नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय, त्यांच्या 'असत्याच्या प्रयोगां'वर मार्मिक टिप्पणी केली आहे.राज ठाकरेंनी पंतप्रधानांना खोटार्डे म्हटलेलं मला आवडलेलं नाही असं वक्तव्य काल नारायण राणे यांनी केलं होतं.

First published: October 2, 2017, 8:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading