S M L

पंतप्रधानांनी सत्ताधारी आणि जनतेमधील दरी कमी केली-राज्यपाल

पंतप्रधान मोदींच्या 3 वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित 'मार्चिंग विथ अ बिलियन' या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा गुरूवारी राजभवनावर संपन्न झाला.

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2017 06:44 PM IST

पंतप्रधानांनी सत्ताधारी आणि जनतेमधील दरी कमी केली-राज्यपाल

मुंबई, 14 जुलै : पंतप्रधानांनी जनतेला विश्वासात घेतल्यामुळेच नोटबंदी आणि जीएसटीचा सारखा महत्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करणं शक्य झालं, असं मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केलं. मोदींच्या 3 वर्षांच्या कारकिर्दीवर आधारित 'मार्चिंग विथ अ बिलियन' या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा गुरूवारी राजभवनावर संपन्न झाला. ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर यांनी हे पुस्तक लिहिलंय. राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं.

राज्यपाल विद्यासागर म्हणाले, नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर कायदा हे दोन महत्वपूर्ण निर्णय प्रधानमंत्र्यांनी घेतले. राजकीय दृष्ट्या हे फार धाडसाचे निर्णय होते. लोकांचा मिळविलेला पाठिंबा गमावण्याचा धोका या निर्णयांमध्ये होता. पण तरीही देशहिताला प्राधान्य देऊन प्रधानमंत्र्यांनी हे निर्णय घेतले आणि त्यामागे असलेली प्रधानमंत्र्यांची स्वच्छ भावना लक्षात घेऊन लोकांनीही या निर्णयांचे स्वागत केले. मागच्या फक्त तीन वर्षाच्या कालावधीत पंतप्रधानांनी देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये मोठे क्रांतिकारी बदल घडविले. निर्णय प्रक्रियेत त्यांनी लोकांचा सहभाग वाढविला, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षातील कार्यकाळावर पुस्तक लिहिण्याचे काम कठीण आहे. मात्र ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर यांनी ते काम उत्तमरित्या केले आहे. हे पुस्तक म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावरील समीक्षण नव्हे तर त्यांनी राबविलेल्या प्रशासनाच्या नव्या मॉडेलचे सार आहे. या नव्या मॉडेलने देशातील जनतेबरोबरच जगभरातील विचारवंत, अभ्यासक आणि विश्लेषक यांना आकर्षित केले आहे. या मॉडेलमधील सर्वच बाजूवर या पुस्तकामध्ये विश्लेषण केले आहे. त्यामुळे भविष्यात संदर्भ म्हणून हे पुस्तक नक्कीच वापरले जाईल.या पुस्तक प्रकाशन समारंभाला शालेय व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल, दिग्दर्शक मधुर भांडारकर आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2017 06:42 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close