कारभार हाती घेताच BMCच्या आयुक्तांनी दाखवली हिंम्मत, केलं हे काम

कारभार हाती घेताच BMCच्या आयुक्तांनी दाखवली हिंम्मत, केलं हे काम

आरोग्‍य यंत्रणेला माझा सर्वतोपरी पाठिंबा आहे. मात्र उपचार, आरोग्‍य सेवा यामध्‍ये कोणतीही त्रुटी राहता नये

  • Share this:

मुंबई 09 मे: मुंबई महानगरपालिका आयुक्‍त पदाचा कारभार स्‍वीकारल्‍यानंतर आयुक्‍त इक्बाल सिंग चहल यांनी नायर रुग्‍णालय आणि धारावी परिसर या दोन्‍ही ठिकाणी आज भेटी देऊन कोरोना संसर्ग प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. त्यांनी आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी PPE Kit परिधान करुन थेट अतिदक्षता कक्षात रुग्‍णांची विचारसही केली.  कोणतीही अडचण असल्‍यास प्रशासनाशी संपर्क करा, असा सल्‍ला त्यांनी रुग्‍ण, डॉक्‍टर्स, निम्‍न-वैद्यकीय कर्मचारी यांच्‍यासह प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही दिला.

नवनियुक्‍त आयुक्‍त चहल यांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा आयुक्‍त पदाचा पदभार स्‍वीकारला. त्‍यानंतर त्यांनी अतिरिक्‍त आयुक्‍त, उप आयुक्‍त यांच्‍यासमवेत बैठक घेऊन कोरोना संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर ते सकाळी थेट नायर रुग्णालयात दाखल झाले. 18 एप्रि‍ल 2020ला नायर रुग्‍णाल हे कोविड रुग्‍णालय म्‍हणून सरकारने घोषीत केलं होतं.

सध्‍या या रुग्‍णालयात 531 खाटा कोव्हिड बाधितांसाठी आहेत. यामध्‍यो 53 अतिदक्षता विभागात आहेत. तर, 110 खाटा गर्भवती महिलांच्‍या प्रसुतिसाठी उपलब्‍ध आहेत. मागील 22 दिवसांत 44 महिलांची प्रसुति सुखरुपणे पार पडली आहे. तर, एकूण 27 डायलिसिस युनिट कोरोना बाधितांसाठी उपलब्‍ध आहेत, अशी माहितीही हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. जोशी यांनी दिली. प्रकृती चिंताजनक असलेल्‍या रुग्‍णांसाठी प्‍लाझ्मा थेरपीचा वापर करुन आयसीएमआर यांच्‍या निर्देशानुसार त्‍यांच्‍यावर उपचार केले जात असल्‍याचेदेखील डॉ. जोशी यांनी सांगितले.

हे वाचा - फडणवीसांनी केला थेट रेल्वेमंत्र्यांना फोन, पुढे काय घडलं?

कोरोना विषाणू संसर्ग रोखण्‍यासाठी अहोरात्र, अथक प्रयत्‍न करत असलेल्‍या वैद्यकीय मंडळींचे त्यांनी आभार मानले. ते पुढे म्हणाले, आरोग्‍य यंत्रणेला माझा सर्वतोपरी पाठिंबा आहे. तथापि, उपचार, आरोग्‍य सेवा यामध्‍ये कोणतीही त्रुटी राहता नये. अडचणी असल्‍यास प्रशासनाशी संपर्क करु शकता, असे आयुक्‍तांनी सांगितले.

त्यानंतर त्यांनी थेट कोरोना बाधितांवर उपचार सुरु असलेल्‍या कक्षात जाऊन पाहणी केली. अतिदक्षता कक्षामध्‍ये प्रत्‍यक्ष कोरोना बाधितांपर्यंत जाऊन वैयक्तिकरित्‍या विचारपूस केली. रुग्‍णालयाकडून मिळणारे उपचार, प्रकृतीत झालेली सुधारणा, औषधे व अन्‍नपुरवठा या संदर्भात रुग्‍णांकडून वस्‍तुस्थिती जाणून घेतली.

 हे वाचा- सोनिया गांधींच्या अडचणीत वाढ, ‘नॅशन हेराल्ड’ प्रकरणी 16.38 कोटींची संपत्ती जप्त

कोरोना बाधेसह इतरही आजार असलेल्‍या रुग्‍णांना धीर देत आयुक्‍तांनी कुठल्‍या सुधारणांची आवश्‍यकता आहे, हेदेखील विचारले. रुग्‍णालयातील परिचारिका, निम्‍न-वैद्यकीय कर्मचारी वर्ग यांचीदेखील कर्तव्‍ये जाणून घेत कोणत्‍या सुविधांची आवश्‍यकता असल्‍यास अथवा अडचणी असल्‍यास प्रशासनाला ताबडतोब कळवावे, असे सांगून त्‍यांचेही मनोबल वाढविले.

नायर रुग्‍णालयाची पाहणी केल्‍यानंतर आयुक्‍तांनी जी/उत्तर विभागातील धारावी येथे मुकुंद नगर व शास्‍त्री नगर या परिसरांमध्‍ये भेट दिली. धारावीमध्‍ये झोपडपट्टी व दाट वस्‍ती असलेल्‍या भागात प्रतिबंधित क्षेत्राजवळ जाऊन प्रत्‍यक्ष नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. सार्वजनिक शौचालयांची पाहणी केल्‍यानंतर तेथील व्‍यवस्‍था सांभाळणाऱया संस्‍थांच्‍या प्रतिनिधींना आयुक्‍तांनी निर्देश दिले. शौचालयांची नियमित सफाई, निर्जंतुकीकरण योग्‍यरित्‍या झाले पाहिजे, पुरेसे हँडवॉश उपलब्‍ध असावेत, अशा सूचना केल्‍या.

First published: May 9, 2020, 7:24 PM IST
Tags: BMC

ताज्या बातम्या