मुंबईत एसी बस कंडक्टरशिवाय धावणार

बेस्टच्या 20 सीटर नव्या एसी बस या कंडक्टररहित करण्याचा महाव्यवस्थापकांनी प्रस्ताव मांडलाय.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2017 12:53 PM IST

मुंबईत एसी बस कंडक्टरशिवाय धावणार

स्वाती लोखंडे,ढोके 28 एप्रिल : बेस्टच्या 20 सीटर नव्या एसी बस या कंडक्टररहित करण्याचा महाव्यवस्थापकांनी प्रस्ताव मांडलाय. या बस आधीच्या फायद्यात असलेल्या एसी बस मार्गावर चालवल्या जातील. एक दरवाजाच्या या बसच्या दरवाज्यात एक मशीन लावली जाईल.  ज्यात कार्ड किंवा पैसे टाकून प्रवास करता येईल का याचाही विचार केला जातोय.

याचबरोबर gps युक्त या बसेस तुम्हाला कुठे पोहोचल्या किंवा ट्रॅफिकमध्ये अडकल्या का हेही पाहता येईल. ओला उबेरला टक्कर देण्यासाठी  आणि बसची जुनी ओळख पुसण्याचा हा प्रयत्न आहे.

या बस भाड्याने घेण्याची टेंडर पद्धतीही संपुष्टात आली असून कंडक्टररहित बसवर मशीन लावण्याचा प्रस्ताव लवकरच समितीपुढे मांडला जाईल. या कंडक्टररहित बसमुळे बेस्टचा खर्च वाचेल. साधारण एका कंडक्टरचा एक दिवसाचा पगार हा 1000 ते 1300 रुपये इतका असतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 28, 2017 12:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...