मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बसेस

मुंबईकरांसाठी 'बेस्ट' बसेस

मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखद करण्यासाठी बेस्ट प्रशासनानं नव्या अत्याधुनिक बस खरेदी केल्यायत.

  • Share this:

मंगेश चिवटे, 25 एप्रिल : बेस्ट प्रशासनाने मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखद करण्यासाठी आता अत्याधुनिक बसेस खरेदी केलेत.आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या बसेसचं लोकार्पण होणाराय. त्यानंतर या नव्या बसेस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होतील.

मुंबईकरांची बेस्ट आता खऱ्या अर्थानं बेस्ट होणाराय. मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखद करण्यासाठी बेस्ट प्रशासनानं नव्या अत्याधुनिक बस खरेदी केल्यायत. या बसेसमध्ये चांगल्या सीट्स, डिजिटल बोर्ड, प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंगची सोय, नवीन लोकलच्या धर्तीवर व्हेंटिलेशन आदी व्यवस्था उपलब्ध आहेत..

बेस्टने आर्थिक अडचणीचं कारण देत कर्मचाऱ्यांचा पगार 3 महिने रखडवला होता. तर दुसरीकडे बेस्टच्या ताफ्यातील AC बसेस बंद करण्याचा निर्णय घेतल्याने बेस्ट प्रशासन चर्चेत राहिलंय. दरम्यान मुंबई महापालिकेकडून 100 कोटी रुपयांच्या विशेष निधीतून या बसेस खरेदी करण्यात आलेत.

बस खरेदीसाठी आर्थिक तजवीज करण्याऱ्या बेस्ट प्रशासनानं मग कर्मचाऱ्यांचा पगार का रखडवला असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होतोय. बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी मात्र प्रवाशांच्या सोयीसाठीच आम्ही बसेस खरेदी केल्या असल्याचा दावा करताहेत.

अत्याधुनिक बसेसच्या माध्यमातून बेस्ट खऱ्या अर्थानं बेस्ट होणार असली तरी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा सातत्याने उठताना दिसतोय. त्यामुळेच आर्थिक नियोजन आणि सुयोग्य प्रशासन यांचा मेळ साधणं बेस्टसाठी गरजेचं आहेत.

First published: April 25, 2017, 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading