मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा घोळात घोळ, निवडणुका तोंडावर पण वाद मिटेना

दिल्लीतही सर्वच कारभार आलबेल असल्याने कुठल्याच प्रश्नावर तातडीने तोडगा निघत नाहीये. त्यामुळे निर्णय लांबत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 23, 2019 03:00 PM IST

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा घोळात घोळ, निवडणुका तोंडावर पण वाद मिटेना

मुंबई 23 जुलै :  विधानसभा निवडणुकांना आता फक्त काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. भाजप आणि शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केलीय. मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद सुटण्याची काही चिन्हं दिसत नाहीत. नेत्यांमध्ये वाद असल्याने त्याबाबात घोळ सुरूच आहे. या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल असं मत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय.  मिलिंद देवरा आणि संजय निरुपम यांच्या गटात वाद असल्यानं हा प्रश्न जास्त चिघळलाय.

लोकसभेतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. राजीनामा देतानाच त्यांनी अध्यक्षपद कुणा एका व्यक्तीकडे न देता तीन जणांची समिती तयार करावी अशी सूचना केली होती. त्यांच्या या सूचनेला संजय निरुम यांनी जाहीरपणे विरोध केला होता. मुंबईच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काही जणांना राष्ट्रीय पातळीवरचं पद पदरात पाडून घ्यायचं आहे अशी टीकाही त्यांनी मिलिंद देवरांवर केली होती.

VIDEO: मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा तिढा सुटेना, यासोबत इतर टॉप 18 बातम्या

दिल्लीतही सर्वच कारभार आलबेल असल्याने कुठल्याच प्रश्नावर तातडीने तोडगा निघत नाहीये. राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतरही नव्या अध्यक्षांची अद्याप निवड करता आलेली नाही. त्यामुळे निर्णय लांबत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी समिती करायची का? या देवरा यांच्या प्रस्तावावर काँग्रेस हायकमांड ऑगस्ट महिन्यात निर्णय घेणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. त्याचबरोबर मिलिंद देवरा यांना अध्यक्ष पदावर कायम ठेवत तीन समिती सदस्य नियुक्ती करण्याबाबतही दिल्लीत विचार सुरू आहे. एकनाथ गायकवाड, हुसेन दलवाई यांच्यासह तीन जणांचा समितीत समावेश करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

Loading...

VIDEO: तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; अग्निशमन दलाने वाचवले प्राण

एकनाथ गायकवाड दलित, दलवाई मुस्लिम असा जातीय सामाजिक विचार तसंच उत्तर भारतीय चेहरा समितीत देण्याबाबत विचार केला जातोय. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड काही दिवसात होईल, दिल्लीतील नेते काही अन्य गोष्टीत अडकून आहेत, पुढील दोन तीन दिवसा निर्णय अपेक्षित आहे असं नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 23, 2019 02:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...