मुंबई, 3 मार्च : सध्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रोज आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यातच शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच जुंपलेली पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सहकार क्षेत्रातील घराणेशाही आता रडारवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधान सभेतील भाषणात, सहकार क्षेत्रातील मक्तेदारी आणि घराणेशाही मोडीत काढण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान सभेत केलेल्या भाषणात राज्यातील सहकार क्षेत्रात केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह कसे लक्ष ठेवून आहेत. सहकार क्षेत्रातील मातब्बर राजकिय घराणी, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील सहकार संस्था, केंद्र सरकारच्या रडारवर आल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. राज्यातील सहकार क्षेत्र बळकट करायचे असेल तर सहकार क्षेत्रातील घराणेशाही मोडीत काढली पाहीजे. तरच सर्व सामान्य शेतकरी आणि नागरिकांना सहकार क्षेत्राचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
तुमच्यासारखं आत्मक्लेश करायला गेलो नाही : मुख्यमंत्री
'मी निवडणूक आयोग म्हणालो, त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तेच म्हणत आहे, लोकसेवा आयोग किंवा निवडणूक आयोगच तेच लावलं आहे. पण आम्ही रिझल्ट दिला आहे, रिझल्टला महत्त्व आहे. मी श्रेय घेत नाही, पण तुमच्यासारखं वसंतराव चव्हाण यांच्या समाधीवर आत्मक्लेश करायला जावं लागलं नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना लगावला.
विधान सभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच चिमटे काढले. अगोदर एमपीएमसीचा निर्णय झाला होती, मी त्यावेळी त्या सरकारमध्ये होतो. पण त्या पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवायची. मी निवडणूक आयोग म्हणालो, त्यावर मी खुलासा केला आहे. पण तरीही तुम्ही लोक तेच म्हणत आहे, लोकसेवा आयोग किंवा निवडणूक आयोगच तेच लावलं आहे. पण आम्ही रिझल्ट दिला आहे, रिझल्टला महत्त्व आहे. मी श्रेय घेत नाही, मी माझ्या पद्धतीने काम करतो. तिथले सगळे अधिकारी तुमच्या ओळखीचे आहे. मी त्यावर खुलासा केला, पण तुमच्यासारखं वसंतराव चव्हाण यांच्या समाधीवर आत्मक्लेश करायला जावं लागलं नाही, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: NCP, Sharad Pawar