S M L

अमित शहांच्या भेटीवर 'सामना'तून खवचट टीका

एकीकडे अमित शहा आज उद्धव ठाकरेंना भेटणारेत, आणि दुसरीकडे सामनामधून या भेटीवर खरमरीत टीका करण्यात आलीये. चला, संपर्क खेळू या, असं या अग्रलेखाचं नाव आहे.

Sonali Deshpande | Updated On: Jun 6, 2018 09:48 AM IST

अमित शहांच्या भेटीवर 'सामना'तून खवचट टीका

मुंबई, 06 जून : एकीकडे अमित शहा आज उद्धव ठाकरेंना भेटणारेत, आणि दुसरीकडे सामनामधून या भेटीवर खरमरीत टीका करण्यात आलीये. चला, संपर्क खेळू या, असं या अग्रलेखाचं नाव आहे. पाहूयात या अग्रलेखात काय म्हटलंय ते.

भारतीय जनता पक्षाने एक व्यापक संपर्क मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी हे जगभ्रमणावर तर राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशभ्रमणावर आहेत. एनडीएतील घटक पक्षांना श्री. शहा भेटणार आहेत म्हणजे नक्की काय करणार आहेत? व ते नेमके आताच म्हणजे पोटनिवडणुकांत भाजपची धूळधाण उडाल्यावरच का भेटत आहेत, हासुद्धा प्रश्नच आहे.

२०१९च्या निवडणुका शिवसेना स्वतंत्रपणे लढणारच आहे, असा पुनरुच्चारही करण्यात आलाय. पालघर पोटनिवडणुकीतील निकालाने शिवसेनेचे 'स्व'बळ दाखवून दिले आहेच. तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या या संपर्क अभियानामागे २०१९च्या सार्वत्रिक निवडणुका हे एक कारण होऊ शकते; पण मुळात सरकार पक्षाचा जनतेशी संपर्क तुटला आहे व त्यामागची कारणे शोधायला हवीत, असा सल्लाही शिवसेनेनं भाजपला दिलाय.

आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांनी भाजपशी संपर्क तोडला आहे. त्यामुळे श्री. शहा यांच्या संपर्क अभियानात नायडू भेटीचाही समावेश आहे काय? राजस्थान, मध्य प्रदेशातही सत्ताबदलाचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्रातही सत्ताबदल अटळ आहे. ३५० जागा भाजपास मिळतील तेव्हाच अयोध्येत राम मंदिर उभारू, असा विडा त्यांनी उचलला आहे. त्यांच्या जिद्दीस सलाम करावा लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 6, 2018 09:48 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close