राज पुरोहित आणि नीलम गोऱ्हे यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

राज पुरोहित आणि नीलम गोऱ्हे यांना मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा

सत्ताधारी पक्षातील मुख्य प्रतोदला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. याआधी त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता. आता त्यांची पदोन्नती करून त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार नोटिफिकेशनही काढणार आहे

  • Share this:

मुंबई, 07 डिसेंबर:  विधानसभेत राज पुरोहित आणि विधान परिषदेत नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे.

सत्ताधारी पक्षातील मुख्य प्रतोदला  कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा  मिळणार आहे.  याआधी त्यांना   राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला होता.  आता त्यांची पदोन्नती करून त्यांना  कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. याबाबत लवकरच राज्य सरकार नोटिफिकेशनही काढणार आहे.

तसंच विधान परिषदेच्या एका जागेसाठी  आज मतदान होतं आहे. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानेही जागा रिकामी झाली होती.  या जागेसाठी काँग्रेसकडून दिलीप माने तर भाजप शिवसेनेकडून प्रसाद लाड  उमेदवार आहे. मुख्य म्हणजे शिवसेनेने लाड यांना पाठिंबा दिला आहे. या जागी नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा होती. पण भाजपने त्यांचा पत्ता कट केला.

त्यामुळे आता यानंतर राज्याच्या राजकारणात काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 11:48 AM IST

ताज्या बातम्या