Home /News /mumbai /

राष्ट्रवादी खडसेंचा उपयोग फडणवीसांविरुद्ध करणार, केंद्रीय मंत्री दानवेंचं मोठं विधान

राष्ट्रवादी खडसेंचा उपयोग फडणवीसांविरुद्ध करणार, केंद्रीय मंत्री दानवेंचं मोठं विधान

'खडसे हे गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थ होते. त्याची जाहीर वाच्यताही त्यांनी अनेकदा केली होती. ते जाऊ नयेत यासाठी खूप प्रयत्न केले मात्र त्यांचं मत त्यांनी तयार केलं होतं.'

    मुंबई 23 ऑक्टोबर: दिग्गज नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीची कास धरली असतानात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसहेब दानवे यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रवादी आता एकनाथ खडसे यांचा उपयोग भाजप आणि देवेंद्र फडणवीसांविरुद्ध करणार असल्याचं वक्तव्य दानवे यांनी केलं. दानवे म्हणाले, खडसे हे लढाऊ नेते आहेत. त्यांनी भाजप वाढविण्यात मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजपची हानी होईल असं मतही त्यांनी व्यक्त केलं. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. खडसे हे गेल्या काही वर्षांपासून अस्वस्थ होते. त्याची जाहीर वाच्यताही त्यांनी अनेकदा केली होती. ते जाऊ नयेत यासाठी खूप प्रयत्न केले मात्र त्यांचं मत त्यांनी तयार केलं होतं असंही दानवे यांनी सांगितलं. राष्ट्रवादीने आता खडसे यांचा विकासासाठी उपयोग करून घ्यावा असंही दानवे म्हणाले. एवढा मोठा नेता जर पक्षात आला तर त्याचा उपयोग हा त्या पक्षाला होतच असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आता राजकारणात त्याचा फायदा करून घेतील असंही दानवे यांनी सांगितलं. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता चर्चा सुरू झाली ती त्यांच्या मंत्रिपदाबाबत. खडसे यांची ज्येष्ठता लक्षात घेता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाईल अशी चर्चा आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, खडसे यांचं पुनर्वसन कसं करायचे ते शरद पवार ठरवतील, अफवा नको, ज्यावेळेस प्रवेश करण्याचे ठरविले जाते त्यावेळेस हे निर्णय होत असतात. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. कोरोनावरील उपचारासाठी पहिल्या औषधाला मंजुरी; रुग्ण लवकर बरा होत असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांची गुरुवारी शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यात विधान परिषद पदवीधर निवडणुकीवर चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली. यावर तीन पक्ष चर्चा करणार आहे. सेनेचे सुभाष देसाई आणि थोरात यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर निर्णय होईल असंही पाटील यांनी सांगितलं. दरम्यान,  एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल अशी चर्चा आहे असा प्रश्न भुजबळांना विचारण्यात आला होता, त्यावर बोलताना ते म्हणाले, यावर शरद पवारच बोलू शकतील. मला त्यातलं काही माहित नाही. राष्ट्रवादीत एकनाथ खडसे यांचं स्वागत आहे. आता सर्व ठरलं आहे, त्यामुळे चर्चेचं कारणच नाही असं त्यांनी सांगितलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Eknath khadse, Raosaheb Danve

    पुढील बातम्या