हे माझं सरकार नाही,भाजप सरकारच्या जाहिरातीला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

हे माझं सरकार नाही,भाजप सरकारच्या जाहिरातीला राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करणार आहे. १ डिसेंबरपासून पदयात्रा सुरू करण्यात येणार आहे.

  • Share this:

14 नोव्हेंबर : राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. शेतकऱ्यांचेही मोठे हाल झालेत. याविरोधात आम्ही येणाऱ्या 25 तारखेपासून हल्लाबोल आंदोलन सुरू करणार आहोत, असं अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. मुंबईत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण यात सरकार अपयशी ठरतंय.  २५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी हल्लाबोल आंदोलन करणार आहे. १ डिसेंबरपासून पदयात्रा सुरू करण्यात येणार आहे. यवतमाळपासून शेतकरी आणि त्रस्त नागरिकांची दिंडी काढण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2017 03:24 PM IST

ताज्या बातम्या