मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शरद पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नेते, ते बोलू शकतात; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांचं उत्तर

शरद पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नेते, ते बोलू शकतात; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांचं उत्तर

दीड तास चाललेल्या या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

दीड तास चाललेल्या या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

दीड तास चाललेल्या या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते.

मुंबई 12 ऑगस्ट: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांना जाहीरपणे फटकारल्यानंतर त्याचे आता पडसाद उमटत आहेत. दिवसभरातल्या चर्चेनंतर रात्री शरद पवारांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठकही पार पडली. या बैठकीत काय चर्चा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दीड तास चाललेल्या या बैठकीत अजित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी महिती देत प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे कुटुंबाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते बोलू शकतात असं पाटील यांनी सांगितलं. पाटील म्हणाले, ही बैठक कालच ठरली होती. यात पार्थ प्रकरणावर चर्चा झाली नाही तर इतर महत्त्वांच्या विषयांवर चर्चा झाली. दरम्यान, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केलीय. आजोबांनी नाताला किती महत्त्व द्यायचं आणि नातवाने आजोबांच्या भूमिकेप्रमाणे वागायचं का हे त्यांनीच ठरवायचं आहे असं फडणवीस म्हणाले. ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मराठा आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांसाठी सरसावले अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.पार्थ यांनी केलेल्या या मागणीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 'माझ्या नातवाच्या मागणीला मी कवडीची किंमत देत नाही, तो अपरिपक्वव आहे' अशा शब्दांत शरद पवार यांनी पार्थ पवार यांची चांगलीच कानउघडणी केली होती. तसंच 'सुशांत प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याची कोणतीही गरज नाही. मुंबई पोलिसांना मी गेल्या 50  वर्षांपासून ओळखतो. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. COVID-19: राज्यातल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या साडेपाच लाखांच्या जवळ 'सुशांतसिंग प्रकरणाची चर्चा करण्याचे कारण नाही. त्यामुळं कुणी काय आरोप केले यात मी खोलात जाणार नाही. माझ्या दृष्टीनं हा विषय तितका महत्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली तर नक्कीच दु:ख होते. परंतु, त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते.' असंही पवार म्हणाले होते.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या