Elec-widget

शहा- ठाकरे भेट: राष्ट्रवादी काँग्रेसचा पोवाडा तुम्ही पाहिला का?

शहा- ठाकरे भेट: राष्ट्रवादी काँग्रेसचा पोवाडा तुम्ही पाहिला का?

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना पत्र प्रमुख उद्धव ठाकरे देखील गेले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला आठवण करुन दिली की, ज्यांना तुम्ही अफजलखान म्हणाला होता.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च: भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा लोकसभा निवडणुकीसाठीचा अर्ज भरण्यासाठी शिवसेना पत्र प्रमुख उद्धव ठाकरे देखील गेले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला आठवण करुन दिली की, ज्यांना तुम्ही अफजलखान म्हणाला होता. आज थेट त्यांच्याच छावणीत कसे काय गेला. हेच का शिवरायांचे मावळे? असा सवाल देखील राष्ट्रवादीने विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात शहा यांच्या सभेचे, रॅलीचे तसेच उद्धव ठाकरे यांच्या भेटी दाखवण्यात आल्या आहेत. तर मागे शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढल्याच्या पराक्रमावर रचलेला पोवाडा ऐकवला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना राष्ट्रवादीने म्हटले आहे की, '५ वर्ष अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज थेट त्यांच्याच छावणीत.. हेच का शिवरायांचे मावळे?? यांनी शिवरायांच्या नावानं मतं मागणं म्हणजे महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचा अपमान आहे.'

राष्ट्रवादीने ट्विटरवर शिवसेना, उद्धव ठाकरे, अमित शहा आणि भाजप महाराष्ट्र यांना टॅग देखील केले आहे.


Loading...
VIDEO : 'तेव्हा राष्ट्रवादीसाठी मानेवर सुरी घेऊन मी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात गेलो'


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 09:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...