राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी, शरद पवार राज्यपालांच्या भेटीला

राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी, शरद पवार राज्यपालांच्या भेटीला

आता खुद्द शरद पवार हे राज्यपालांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे काय तोडगा निघतो हे पाहण्याचं ठरणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे : राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात शासकीय निर्णय घेण्यावरून वाद पेटला आहे. राज्यपालांनी शासकीय कामकाजात हस्तक्षेप केल्यामुळे मंत्र्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीला पोहोचले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेटीचे निमंत्रण दिल्यानंतर शरद पवार राजभवनावर पोहोचले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल आणि शरद पवारांची ही पहिलीच भेट आहे. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा -..मग लक्षात ठेवा, योगी आदित्यनाथ यांना राज ठाकरेंचं जशास तसे उत्तर

काही दिवसांपासून राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये वाद पेटला आहे. अलीकडेच उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या परीक्षांबद्दल भूमिका घेतली होती. त्यांच्या या निर्णयावर राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. राज्यपालांनी कोरोना परिस्थितीत विद्यापीठाच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी केली होती.  त्यांच्या या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले.

त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती. 'राज्यपाल सरकारवर नाराज आहे, असे प्रश्न विचारले जात आहे. मुळात त्यांचे आणि सरकारचे संबंध गोड आहेत. राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे संबंध हे चांगले आहेत. त्यांचे संबंध हे एखाद्या पिता पुत्राप्रमाणे आहे' अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली होती.

हेही वाचा-पियूष गोयल Vs उद्धव ठाकरे वाद शिगेला पोहोचला, रेल्वेमंत्र्यांचं मध्यरात्री ट्वीट

मंत्री उदय सामंत यांच्या निर्णयाबद्दल राज्यपालांनी पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले की,  उदय सामंत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी अजून निर्णय घेतला नाही. राज्यपाल हे विद्यापीठाचे कुलपती आहे. त्यामुळे ते इतर मंत्र्यांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतली' असं राऊत यांनी सांगितलं होतं.

त्यामुळे आता  खुद्द शरद पवार हे राज्यपालांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे काय तोडगा निघतो हे पाहण्याचं ठरणार आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 25, 2020, 1:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading